पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला हा विषय देशाच्या सुरक्षेचा आहे, विश्र्वात भारतीय सामरीक शक्तीची मोजमाप करण्याची वेळ आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारसोबत देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने आम्ही तुमच्या निर्णयात सहभागी आहोत असे जाहीर केले. परंतू काही नेत्यांना बोलघेवडेपणाची सवय असते. या सवईमुळे त्यांच्या राजकीय पक्षाचा पैलु सुध्दा अडचणीत येतो. कॉंगे्रस पक्षात तर भारतीय जनता पार्टीचे काही स्लिपर सेल नेते आहेत. ते तर कॉंगे्रस नेत्यांना बोलायला लावतात आणि त्यांच्या बोलण्याचा राजकीय फायदा भाजप घेत असते. त्यामुळे विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांनी आता आपल्या पक्षातील बोलघेवड्या नेत्यांना पक्षाच्या पैलु विरुध्द न बोलण्याची कडक सुचना केली आहे. पण हाच निर्णय किंबहुना हाच आदेश भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या बोलघेवड्या नेत्यांना देतील काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
पहलगाम हल्यानंतर कॉंगे्रस पक्षाने आपल्या पक्षाच्यावतीने एक धोरण जाहीर केले. त्या धोरणानुसार पहलगाम हल्या हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे आणि त्यात पक्षाच्यावतीने आम्ही सरकारसोबत आहोत. सरकार सांगेल त्या पध्दतीने आम्ही सुध्दा काम करायला तयार आहोत असे जाहीर करून भारतीय प्रगल्भ लोकशाहीची अत्यंत उत्कृष्ट प्रतिमा जगासमोर दाखवली. परंतू काही कॉंगे्रस नेते स्वत: सेल्फगोल करत आहेत. कॉंगे्रस पक्षात काही मंडळी भारतीय जनता पार्टीची स्लिपरसेल आहे. त्यामुळे ती मंडळी ज्या पध्दतीने कॉंगे्रस नेत्यांना बोलायला लावते. त्याप्र्रमाणे ते बोलतात आणि त्यांच्या बोलण्याच्या संपुर्ण वक्तव्यातील काही वाक्य, दोन चार शब्द घेवून भारतीय जनता पार्टी त्याचे राजकीय भांडवल करत असते आणि अशा प्रकरणांमुळे कॉंगे्रस पक्षाचे एक पाऊल मागे जाते. कॉंगे्रस पक्षाचे प्रमुख खा.मल्लीकार्जुन खरगे आणि विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांना या संदर्भाची कडक सुचना दिली आहे की, कॉंगे्रस पक्षाच्या धोरणाशिवाय कोणीही एक शब्द बोलू नये. कॉंगे्रस पक्षाची जी भुमीका पहलगामबद्दल आहे तेवढीच बोला. ही सुचना कॉंग्रेसमध्ये राहुन भारतीय जनता पार्टीला फायदा पोहचविणाऱ्यांसाठी मोठा धक्का आहे.
कॉंग्रेस पक्षाने तर आपल्या बोलघेवड्या नेत्यांवर बंधने टाकली. पण अशीच बंधने भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निशिकांत दुबे, अनुराग ठाकुर, रविशंकरप्रसाद, गिरीराजसिंह यांच्यावर टाकतील काय? यासाठी काही मुद्दे आम्ही वाचकांना सहज कळावेत म्हणून लिहित आहोत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरम्या यांनी दिलेले एक वक्तव्य भारतीय जनता पार्टीने समोर आणून त्याची चिरफाड केली. सिध्दरमय्याचे वक्तव्य पाकिस्तान टी.व्ही. चालवत आहेत म्हणून घेरण्याचा प्रयत्न केला. शेवटी सिध्दरमय्याला याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. महाराष्ट्राचे कॉंग्रेस नेते विजय वडट्टीवार हे बोलतांना अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या मारल्या असे म्हटले. हे वाक्य तर भारतीय जनता पार्टीचे आहे. त्यांना संधीच मिळाली. कॉंगे्रस पक्षाचे नेते सैफोद्दीन यांनी सुध्दा पाकिस्तान आमचा हात नाही असे म्हणत आहे. तर त्यांचे मानायला हवे असे सांगितले. खा. सोनिया गांधी यांचे जावई रॉबट वाड्रा यांनी सुध्दा एएनआयला दिलेला एका मुलाखतीचा विपरियास्त करण्यात आला. तेंव्हा वाड्रा यांनी पुन्हा ट्विट करून आपली बाजू मांडतांना सांगितले की, मी सांगितलेल्या सर्व शब्दांना, वाक्यांना एकत्रीत वाचून त्याचा अर्थ लावा. त्यांना वेगवेगळे करून वाचलात तर त्याचा अर्थ दुसरा होईल.
पण भारतीय जनता पार्टीच्यावतीने गिरीराजसिंह सांगतात सर्व मुस्लिम पाकिस्तानला जा. खा.निशिकांत दुबे म्हणतात 2025 मध्ये पाकिस्तानचे चार तुकडे होतील आणि त्यासाठी मोदी सरकार ची ते ग्वाही देतात. खरे तर नरेंद्र मोदी यांनी यांना पण सांगायला हवे की, हा अंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. भारताच्या सामरीक शक्तीची सिध्दता जगात करायची आहे. तेंव्हा असे काही बोलण्या अगोदर पुर्णपणे लक्षात असूद्या की आम्ही काय बोलत आहोत. पण हे शक्य आहे काय? आणि हे शक्य नाही तर या पध्दतीला कसे चालवले जाऊ शकते. जेणे करून हा सध्या सुरू असलेला अंतरराष्ट्रीय मुद्दा भारताच्या नेत्यांमुळे जगात भारताचे हसु होणार नाही. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
Leave a Reply