सन 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात एनआयए(राष्ट्रीय तपास यंत्रणा) ने आता त्या खटल्यातील दोषी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. प्रसारमाध्यमांनी ही बातमी लपवली. का लपवली हे देवच जाणे, पण आम्ही वाचकांसाठी या बातमीतील तथ्य सादर करत आहोत. अचानकच एनआयए का उलटली. नाही तर काही वर्षांपुर्वी हीच एनआयए आमच्याकडे सबळ पुरावे नाहीत असे सांगत होती. याचा अर्थ या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळावा म्हणून आमच्याकडे असलेले अनेक सत्य एनआयएने दाबून ठेवले होते काय? आणि आता ते सत्य का उघड होत आहेत. येत्या 8 मे रोजी या प्रकरणाचा निकाल येणार आहे. न्यायाधीश ए.के.लाहोटी यांच्यासमक्ष ही सुनावणी पुर्ण झालेली आहे. एनआयएने असे का केले याचा उहापोह करू तेंव्हा अनेक पेलू आम्ही वाचकांसाठी सादर करत आहोत. निर्णय वाचकांनी घ्यायचा आहे.
17 वर्षापुर्वी मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी रमजानच्या महिन्यात प्रार्थना करून परत जात असतांना मस्जिदीसमोर हा बॉम्बस्फोट झाला. ज्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आणि 100 पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले. या प्रकरणाचा तपास झाला तेंव्हा तेथे सापडलेली एक स्कुटर प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर नोंदणीकृत होती. त्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर उपाध्याय, चर्तुवेदी, शाहु यांच्यासह अनेक आरोपी सामिल झाले. या प्रकरणातील तपासीक अंमलदार हेमंत करकरे हे सुध्दा आयपीएस अधिकारी होते. त्यांचा या तपासाच्या संदर्भाने मोठा सहभाग होता. पुढे दुर्देवाने त्यांना हौतात्म प्राप्त झाले. त्यावेळी प्रज्ञासिंह ठाकूर या खुप काही वाईट त्यांच्या बद्दल बोलल्या होत्या. पुढे कर्करोगाचा आजार आहे. म्हणून साधवी प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात व्हिलचेअरवर येत होत्या. नंतर त्यांना जामीन मिळाला आणि त्या फुटबॉल, व्हॉलीबॉल सुध्दा खेळू लागल्या. यानंतर 2014 च्या निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदार संघातून त्यांनी कॉंगे्रसचे दिग्वजयसिंह यांचा पराभव केला आणि त्या खासदार झाल्या. संसदेत सुध्दा त्यांनी नथुराम गोडसेची प्रशंसा केली होती. त्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या प्रकरणातील आरोपींना पाठींबा होताच.
2014 नंतर बरेच वर्ष हे प्रकरण असे प्रलंबित ठेवण्यात आले होते की, एनआयए ही यंत्रणा सांगत होती की, आमच्याकडे या प्रकरणातील सबळ पुरावे उपलब्ध नाहीत. आता 8 मे रोजी याप्रकरणाचा निकाल येणार आहे. यात एकूण 313 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले आहेत. त्यातील 32 साक्षीदार उलटले आहेत. एनआयएने 1500 पानांचा युक्तीवाद सादर करतांना या प्रकरणातील प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर उपाध्याय, चर्तुवेदी, शाहु या सर्वांना फाशी द्यावी असे सादरीकरण केले आहे. याचा अर्थ या प्रकरणात अचानकच एनआयएकडे एवढे पुरावे कसे उपलब्ध झाले. हा प्रश्न सुध्दा आहे. निर्णय येईल तेंव्हा काय तो निर्णय असेल हे तर त्याच दिवशी कळेल. एनआयएने सांगितले म्हणजे फाशी होत नसते. पण या एनआयएच्या सादरीकरणामागे असलेले पैलू आम्ही वाचकांसाठी सादर करत आहोत.
एनआयए ही यंत्रणा थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे. पहलगामच्या बैसारन घाटी येथे असलेला हल्याचा इनपुट भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनीच गृहमंत्रालयाला दिला असेल. तरी पण गृहमंत्रालयाने त्याचे गांभीर्य घेतले नाही आणि 22 एप्रिल रोजी बैसारन घाटीमध्येक अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. म्हणजे हे भांडण अमित शाह विरुध्द अजित डोबाल आहे काय? तसेच अनेक प्रकरणांमध्ये पीएमओला केंद्रीय गृहमंत्रालयाने डोळे दाखवलेले आहेत. म्हणजे पीएमओ पेक्षा गृहमंत्रालय मोठे झाले आहे आणि एनआयए त्यांचे ऐकते म्हणून मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात एनआयएने आता फाशीची मागणी केली आहे काय? आजही भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांची निवड झालेली नाही. त्यासाठी आरएसएसने नाव घोषीत केलेले आहे. परंतू ते नाव सत्ताधाऱ्यांना मंजुर नसेल. म्हणून एनआयएच्या मार्फत मालेगाव बॉम्बस्फोट खटल्या मागणी करण्यात आलेली फाशीची शिक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इशारा आहे काय? पुढे असे सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही की, केंद्रात बसलेले दोन गुजराती नवीन सरसंघचालक निवडतील आणि यापेक्षा जास्त दबाव आला तर सध्याच्या सरसंघचालकांना अटक सुध्दा होईल. भारतीय आध्यात्मिक दृष्टीकोणातून देशासमोर तयार झालेला हा भस्मासुर संपविण्यासाठी प्रभु विष्णुला पुन्हा एकदा सुंदरीचे रुप घ्यावे लागेल असे वाटते. एनआयएचे हे सादरीकरण गिव्ह ऍन्ड टेकचा प्रकार असू शकतो ना? म्हणजे तुम्ही आमच्यासाठी हे करा आम्ही तुमच्यासाठी ते करू. आरएसएसविरुध्द धनुष्यावर लावलेला हा बाण आहे. तो फक्त सोडायचा आहे. अजित डोबाल भारताचे जेम्स बॉंन्ड आहेत. मग त्यांची किंमत काय होत आहे. त्यांचा ईतिहास पाहिला, वाचला, समजून घेतला तर लाज आणि शरमेने अनेकांना मृत्यू येईल असा आहे. तरी पण त्यांच्या शब्दांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही याचा अर्थ भारतीय राजकारण किती खालच्या स्तराला गेले आहे. भारतातील एकता समाप्त करून सत्ताधाऱ्यांना फक्त लोणी खायचे आहे. एनआयएचा वापर करून ते लोणी खायचे आहे. आम्ही तीन प्रश्न वाचकांसमोर मांडत आहोत. एनआयएकडे अचानक एवढे पुरावे आले कसे की ज्याद्वारे फाशी मागण्यात आली. असे गंभीर आरोप असणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूरला खासदार का केले. भारताच्या प्रसारमाध्यमातील आम्हीच देश चालवितो असे दाखविणाऱ्याा इमानदार पत्रकारांनी एनआयएने दाखल केलेली फाशीच्या मागणीची बातमी का लपवली.
Leave a Reply