नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या कार्यवाहीने पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी पाकिस्तान तरसणार आहे हा भारतीय जनता पार्टीचा खोटा प्रचार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली.
नांदेड जिल्ह्यातील पानभोसी गावात विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर नांदेडमध्ये आले असतांना ते पत्रकारांशी पहलगाम येथील हल्याबाबत बोलत होते.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, भारत सरकारचे सचिव देवाशिष मुखर्जी यांनी पाकिस्तानचे सचिव सय्यद मुर्तुजा यांना लिहिले पत्र पत्रकारांना दाखवून ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले हे पत्र म्हणजे न्यायालयात मिळणारा जैसे थे परिस्थितीचा आदेश म्हणजे आम्ही पत्र लिहिले आहे. तुम्हाला याचा काय अर्थ काढायचा ते काढा. या पत्रात कोणत्याच शब्दाचा अर्थ असा निघत नाही ज्यामुळे असे म्हणतात येईल की भारताने पाकिस्तानचे पाणी थांबवले आहे किंवा थांबवणार आहे. भारतीय जनता पार्टीचे हे नॅरेटीव्ह खोटे आहे. पुलवामा आणि पहलगाम या दोन घटनांबाबत भारतातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर नाहीत. भारतातील प्रत्येक नागरीकाने हे पत्र वाचायला हवे. तरच त्यांना या पत्रातील सत्यता कळेल. उगीचच आपल्या पत्रकारांकडून बुंद-बुंद को तरसे गा पाकिस्तान अशा बातम्या दिल्याने तसे काही घडत नसते.
भारत सरकारने पाकिस्तानविरुध्द सैन्य प्रतिक्रिया द्यावी यासाठी मी आणि माझे समर्थक 2 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजेनंतर मुंबई येथील हुतात्मा स्मारकासमोर आंदोलन करणार आहोत. कारण सैन्य म्हणते प्रतिक्रिया देवूया पण राजकीय नेते तयार नाहीत. त्या राजकीय नेत्यांचे मनोबल वाढविण्यासाठी किंबहुना त्यांना निर्णय घेण्याची ताकत यावी म्हणून आमचे आंदोलन आहे. 2 मे रोजी आम्ही भारतीय तिरंगा ध्वजाच्या छायेत हे आंदोलन करणार आहोत. त्यामुळे इतर राजकीय पक्षांना सुध्दा आम्ही आवाहन करतो आहोत की, आमच्या या आंदोलनात सहभागी व्हा. केंद्र सरकारला असे वाटत असेल की, भारतीय तिजोरीत पैसे नाहीत तर ते पैसे सुध्दा देण्यास आम्ही तयार आहोत. त्या दिवशी आम्ही सैन्य प्रतिक्रियेसाठी दान पण करण्यास तयार आहोत.
Leave a Reply