राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती
नांदेड :- राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भुमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी आमदार भीमराव केराम, आमदार बाबुराव कोहळीकर, श्रीमती बेबीताई प्रदीप नाईक, प्रफुल राठोड, डॉ. बेलखोडे, तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी परोटी तांडा व परिसरातील समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले. परोटीतांडा येथील शाळेच्या मैदानावर राज्यमंत्री नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आमदार केराम, आमदार कोहळीकर, श्रीमती नाईक यांनी नागरिकांच्या विविध समस्या सोडण्याबाबत विचार मांडले. प्रास्ताविक नारायण आडे यांनी केले. शेवटी आभार डॉ. मेरसिंग चव्हाण यांनी मानले.
सर्वप्रथम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सहस्त्रकुंड येथील महादेव मंदिराचे दर्शन घेऊन ट्रस्ट व ग्रामपंचायत वाळकीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील सरपंच, उपसरपंच, नाईक, कार्यकर्ते यासह समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.
Leave a Reply