अर्धापूर- समग्र सोशल फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर संस्थेच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील लोणी (बु) येथील पत्रकार गंगाधर घनश्याम सोनटक्के यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 4 मे रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सन्मित्र कॉलनी रॉक्सी टॉकीज, शेजारी पैठण,गेट छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर होताच पत्रकार गंगाधर सोनटक्के यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षा होत आहे.
अर्धापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर सोनटक्के ही नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तसेच आपल्या लेखणी द्वारे वर्तमानपत्रातून गोरगरिबांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवितात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना दोन महिन्या पुर्वी आदिलाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर येथील समग्र सोशल फाउंडेशन च्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेत.त्यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 4 मे 2025 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सन्मित्र कॉलनी रॉक्सी टॉकीज शेजारी पैठण गेट छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कळतात मराठी पत्रकार परिषद संघाच्या वतीने गंगाधर सोनटक्के यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षा होत आहे.
Leave a Reply