नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासिका शांताबाई नारायणराव मोरे (82) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांची अंतिमयात्रा आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
डॉ.आंबेडकरनगरमधील ज्येष्ठ उपासिका शांताबाई नारायणराव मोरे यांचे आज 28 एप्रिल 2025 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांची अंतिमयात्रा सायंकाळी 6 वाजता त्यांच्या घरून निघेल आणि शांतीधाम प्रतिष्ठाण गोवर्धनघाट येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत. जुन्या पिढीतील ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते, स्वातंत्र्य सैनानी, दलित मित्र स्मृतीशेष हनुमंतराव उर्फ काकासाहेब मोरे यांच्या त्या सुनबाई आहेत. समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी स्मृतीशेष नारायणराव मोरे यांच्या त्या पत्नी होत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील ज्येष्ठ नेते व भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते, स्मृतीशेष सुनिलदादा मोरे व औरंगाबाद उच्च न्यायालयातील वकील, न्यु जनता शिक्षण प्रसारक मंडळचे सचिव, भारीप बहुजन महासंघाचे माजी शहराध्यक्ष ऍड. यशवंत मोरे यांच्या त्या मातोश्री आहेत. रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रवक्ते व न्यु जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष युवा नेते प्रतिक सुनिलदादा मोरे यांच्या त्या आजी आहेत.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने सुध्दा ज्येष्ठ उपासिका शांताबाई नारायणराव मोरे यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
Leave a Reply