नांदेड(प्रतिनिधी)-रासायनिक खतांच्या विक्रीसोबत होणाऱ्या गोलमाल प्रकरणी नांदेड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय रासायनिक खते मंत्री जे.पी.नड्डा यांना भेटून खत विक्रीमध्ये असणारा लिंकींग प्रकार बंद करावा. जिल्ह्यातील खत साठा जिल्ह्यात विक्री व्हावा. खत वाहतुक ठेवा संबंधीत व्यापाऱ्याला न देता दुसऱ्या कंपनीला देण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.
काही दिवसांतच शेतीतील कामांचा शुभारंभ होईल. त्यात सुरुवातीला बि-बियाणे, त्यानंतर खत अशा पध्दतीने हे काम चालते. पुढे काही कृषी औषधींचा वापर शेतकऱ्यांना करावा लागतो. पण या सर्व प्रकारामध्ये केंद्र बिंदु असलेला शेतकरी नेहमीच भरडला जातो. सोबतच जे मोठे व्यापारी आहेत. त्यांना काही न होता. छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांवर कायद्याचा बडगा दाखवला जातो आणि मोठे सर्व काळाबाजार करून त्यातून नामशेष राहतात.
काल दि.27 एप्रिल रोजी केंद्रीय रासायानिक खते व उर्वरक मंत्री जे.पी.नड्डा हे छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. तेंव्हा नांदेड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघ त्यांना भेटायला गेले होते. त्यात सरकारच्या लेखी आदेशानंतर सुध्दा नांदेड जिल्ह्यातील रासायनिक खतांच्या कंपन्या आणि अधिकृत विक्रेत्यांना अन्य अनावश्यक साहित्यासोबत जोडले जात आहे. ही बेकायदा लिंकिंग पध्दती बंद करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना योग्य दरावर खत उपलब्ध करता येईल अशी सोय करावी.
नांदेड जिल्ह्याचा खत साठा नांदेड जिल्ह्यातच विक्री झाला पाहिजे. कारण हा खत साठा अधिक पैशांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये विक्री केला जातो आणि नांदेड जिल्ह्यात खतांची कमतरता होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे देवून खत खरेदी करावे लागते. खत संबंधीत वाहतुक ठेकेदारी, रेल्वे ठेकेदारी, कंत्राटदारांची कृषी संबंधीत विक्रेता यांच्या नातलगांना ती ठेकेदारी देणे अयोग्य आहे. कारण किरकोळ विक्रेत्यांना योग्य वेळेत कृषी साहित्य मिळत नाही आणि ठोक विक्रेता अन्याय करत असतो. त्यामुळे पुरवठा करणारा ठेकेदार हा दुसरा असायला हवा. खत कंपन्यांच्यावतीने साहित्य दुकानावर पोहचल्यानंतर त्याची पावती दिली पाहिजे. वरई खत पुरवठा कंत्राटदार दिली पाहिजे. टीजीआर विक्री बंद व्हावी. महाराष्ट्रात टीजीआर प्रयोगशाळा नाही. त्यामुळे अप्रामाणिक टीजीआर विक्री होत आहे. या प्रसंगी नांदेड जिल्हा कृषी साहित्य विक्री संघाचे अध्यक्ष ईश्र्वरप्रसाद आग्रवाल आणि सचिव धनराज मंत्री यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
खताच्या विक्रीमध्ये होणारी बेकायदा लिंकींग थांबविण्यासाठी जे.पी.नड्डा यांना निवेदन

Leave a Reply