नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या परिपत्रकानुसार मुल्य निवीदा भरुन देखील अल्फा इंटरप्रायजेस या ऐंजन्सीला नियमानुसार काम देण्याची स्थिती असताना ही नांदेडचे अधिक्षक अभियं सुधाकर जाधव यांनी नियमाना बगल देत सदरील काम डिस्क कॉलीफाय (अपात्र ऐजन्सीला) देण्याचे षडयंत्र रचले आहे. याबाबत पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे अल्फा इंटरप्रायजेसचे विशाल सुर्यवंशी यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. व तत्काळ न्याय न मिळाल्यास ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनी अमरण उपोषण करण्याचा इशारा अल्फा इंटरप्रायजेस तर्फे विशाल सुर्यवंशी यांनी दिला आहे..
सदरील तक्रारी नुसार अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव हे दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर व इतर दोषीवर कारवाई करावी, असे आदेश मुख्य अभियंता लातूर यांनी नांदेडचे मुख्य अभियंता यांना कळविले आहे. छ.संभाजीनगर येथील सहव्यवस्थापकीय संचालक प्रादेशीक कार्यालय यांनी लातूरच्या मुख्य अभियंता यांना या कारवाई बाबत आदेशीत केले आहे. त्यामुळे जाधव यांच्यावर कारवाई करणे अपेक्षीत असतानाही वरिष्ठांनी आजवर चालढकल केली आहे. यापूर्वी ही निविदेमध्ये मनमानी करुन अपात्र एजन्सीला निविदा मंजूर केल्यामुळे वरिष्ठ कार्यालयांनी तक्रारी नंतर ती निवीदा रद्द केली होती, असेही विशाल सुर्यवंशी यांनी पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
शेतकऱ्यांना वीज देण्याचे काम तसेच ए.जी.पंपाचे काम व डि.पी.डी.सी. चे बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार म्हणुन ज्युनिअर टेक्निशीएन व ज्युनिअर ऑपरेटर पुरविण्याचे काम गेल्या १५ वर्षापासून अल्फा इंटरप्रायजेस मार्फत केले जाते. बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार पुरविण्याची निविदा अल्फा इंटरप्रायजेसने सादर केली होती. या कंपनीला सदरील काम मिळण्याचे जवळपास निश्चित झाले होते.
असे असतानाही नांदेडचे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी मनमानी करत सदरील काम अल्फा इंटरप्रायजेसला मिळू नऐ अशी वेळ आनली. त्यामुळे त्यांच्या या कारभाराची रितसर तक्रार छ. संभाजीनगर येथे वरिष्ठांना सादर केल्यावर त्यांच्या विरुध्द कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. असे असताना देखील त्यांची चौकशी होऊन कडक कारवाई टाळली जात आहे. त्यांना संरक्षण देणाऱ्या वरिष्ठांविरुध्द गरज भासल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल असा ईशारा ही विशाल सुर्यवंशी यांनी दिला आहे. यापूर्वी ही अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या विरुध्द कारवाई झालेली आहे. तसेच पोलीस स्थानकात खोटे कागदपत्र दिल्या प्रकरणी त्यांच्या विरुध्द कारवाई सुरु आहे.
पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेडचे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या विरुध्द कड कारवाई करुन त्यांची चौकशी करावी, अन्यथा ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनी आपल्याला अमरण उपोषण करावे लागेल असा इशारा ही अल्फा इंटरप्रायजेस तर्फे विशाल सुर्यवंशी यांनी दिला आहे.
Leave a Reply