नांदेड :- ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित विविध समस्येवर विशेष चर्चा करण्यासाठी बुधवार 30 एप्रिल 2025 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे सकाळी 9.30 वा. नांदेड येथील न्यायालयाचे _*प्रमुख*_ न्यायाधीश दलजीतजी कौर जज यांनी आढावा बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगार, मुकादम, ऊस वाहतूकदार, अपघाती मयत ऊसतोड कामगारांचे जे वारस असतील त्यांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
या बैठकीला तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेस सामाजिक न्याय विभाग नांदेड यांच्यावतीने निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नमस्कार चौकाजवळ ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे करण्यात आले आहे. संबंधित सर्वांनी या बैठकीस 30 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वा. जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply