नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरातील जिल्हा घटप्रमुखांकडून सहाय्यक पोलीस महानिरिक्षक (का.व.सु.) राजतिलक रौशन यांनी सन 2024 आणि 2025 मध्ये मानसिक आरोग्य कायदा 2017 च्या कलम 100 प्रमाणे केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली आहे.
राज्याच्या मानवी हक्क आयोगासमोर सुरु असलेल्या एका प्रकरणाच्या अनुशंगाने मानसिक आरोग्य कायदा 2017 मधील कलम 100 प्रमाणे पोलीसांवर दिलेली जबाबदारी कशा पध्दतीने पुर्ण करण्यात आली आहे. याची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने मागवली आहे. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून सन 2024 मध्ये मानसिक आरोग्य कायदा कलम 100 प्रमाणे झालेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती मागितली आहे. तसेच सध्या सुरू असलेले वर्ष 2025 मध्ये मार्च 2025 पर्यंतची माहिती 5 मेपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठवायची आहे असे नमुद करून लवकरात लवकर ही माहिती देण्यासाठी सांगितले आहे.
कलम 100 प्रमाणे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या मानसाच्या प्रती त्यांची कर्तव्य नमुद केली आहेत. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल मानसीक आरोग्याची तक्रार आली तर त्यावर काय कार्यवाही करावी, तो माणुस कुटूंबातला नसेल एकटा असेल तर काय कार्यवाही करावी अशा जबाबदाऱ्या या कलमात नमुद करण्यात आलेल्या आहेत. अशा व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत पोेलीस बंदोबस्तात किंवा तुरूंगात ठेवता येत नाही. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या सुचनेनुसार त्या व्यक्तीला व्यक्तीच्या निवासस्थानी किंवा सरकारी निवासस्थान नसलेल्या व्यक्तीच्या घरी ठेवण्याचे आदेश या कलमांमध्ये आहे.
मानसिक आरोग्य कायद्यातील जबाबदाऱ्या पुर्ण करणे पोलीसांचे काम

Leave a Reply