नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी नांदेड येथील पत्रकार अभयकुमार दांडगे यांना संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती दिली आहे. या पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे हे आहेत.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी निर्गमित केलेल्या पत्रानुसार नांदेड येथील पत्रकार अभयकुमार दांडगे यांना पत्रकार संघटक संजय भोकरे यांच्या सुचनेनुसार प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती दिली आहे. पत्रकार संघाचे ध्येय,धोरण आणि संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे असे या पत्रात नमुद आहे. ग्रामीण आणि शहरी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Leave a Reply