नांदेड(प्रतिनिधी)-मंतरलेल्या सोन्याच्या देवाच्या मुर्त्या राहिल्या तर तुझ्या घर ात भरभराट येईल असे सांगून एका 53 वर्षीय व्यक्तीकडून 20 लाख रुपये लुट केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चार जणांच्या नवासह सात जणांविरुध्द जादुटोणा कायदा संदर्भाने लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोलासिंह रामलालसिंह गहलोत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फेबु्रवारी 2024 मध्ये गणेश केशटवार यांच्या शेतात, लिंबगाव-नांदेड रस्त्यावर जाफर बाबा गौसीयानगर कळमनुरी जि.हिंगोली, मेहराज लेबर कॉलनी नांदेड, समिर रा.पहेलवान टी हाऊस जवळ नांदेड, शोएब जाफर बाबा रा.गौसीयानगर कळमनुरी जि.हिंगोली आणि इतर तिन जणांनी त्यांना मंतरलेल्या सोन्याच्या मुर्त्या तुझ्या घरात ठेवल्या तर तुझ्या घरात भरभराट येईल असे सांगून भोलासिंहकडून 20 लाख रुपये घेतले. लालकपड्यामध्ये गुंडाळून एकूण 5 पितळी धातुच्या मुर्त्या त्यांना दिल्या. आठवडा भर हा कपडा काढायचा नाही अशी सुचना दिली. आठवड्याभरानंतर पाहिले असता त्या मुर्त्या सोन्याच्या नव्हत्या तर पितळी धातुच्या होत्या. त्यानुसार लिंबगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी सात जणांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 3(5) आाणि नरबळी आणि इतर आमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध आणि त्यांचे उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम 2013 मधील कलम 3 नुसार गुन्हा क्रमांक 52/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभाग नंादेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरिक्षक आयुब हे अधिक तपास करणार आहेत.
Leave a Reply