नांदेड:- नांदेड जिल्ह्याचे तापमान ४३ अंशाच्यावर गेले आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे. परिणामी मे महिन्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जाण्यांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
शनिवार २६ एप्रिल, २०२५ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्येल निवासी उपजिल्हाजधिकारी महेश वडदकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता अजय दाभाडे, कार्यकारी अभियंता चौगले, जिल्हा प्रशासन अधिकारी गंगाधर इरलोड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपाचे प्रतिनिधी इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच व्हीसीव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगर परिषदचे मुख्याधिकारी हे सहभागी होते.
सध्या मानार प्रकल्पात ४६ टक्के, विष्णुपूरी प्रकल्प ३१ टक्के, मध्यम प्रकल्प २९ टक्के, उच्च पातळी बंधारे ३६ टक्के, लघु प्रकल्प १९ टक्के पाणी साठा शिल्लक असून हा साठा माहे जून अखेरपर्यंत पुरेसा आहे. परंतु जून मध्ये पर्जन्यमान कमी झाल्यास टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सध्या जिल्ह्यात १४ टॅंकर व ९१ विहीर अधिग्रहणाव्दारे पाणी पुरवठा चालू असून आणखी ६ टॅंकर व १९७ विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजुरीच्या स्तरावर आहेत. नळ योजना दुरुस्ती २१५ प्रस्ताव, पूरक नळ योजना ६६ व नविन विंधन विहीर ७४० अशा विविध योजनांना प्रशासकीय मान्याता देण्यात आली असून सदर कामे प्रगतीपथावर आहेत.
मुखेड तालुक्यामध्ये वाडी तांडयावर टॅंकर व विहीर अधिग्रहणाची संख्या जास्त असल्यामुळे जल जीवन मिशनची कामे तात्काळ पूर्ण करुन टंचाईग्रस्तॅ वाडी/तांडयावरील टंचाईची समस्या मिटवावी तसेच जलयुक्त शिवारची कामे हाती घ्यावीत, अशा सुचना संबंधित विभागास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिल्या आहेत.
मे महिन्यात टंचाईची तीव्रता वाढणार असल्या मुळे विविध जलाशयातून/कॅनालव्दारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची चोरी होणार नाही यादृष्टीने अनाधिकृत मोटारी जप्ता करण्याशबाबत पथकांची नियुक्ती करण्यात यावी. जलयुक्त शिवाराची जास्तीत जास्त कामे हाती घेऊन पूर्ण केल्यास सिंचनासाठीच्या पाण्याची आवश्यकता कमी होईल त्यादृष्टीने संबंधित विभागाने कार्यवाही करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
Leave a Reply