नांदेड(प्रतिनिधी)-शहरात मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेच्यावतीने प्रशस्त अस उद्यान निर्माण करण्यात आल आहे. मात्र या उद्यानाची अवस्था दिवेंस दिवस बिकट होत चालली आहे. या उद्यानात झालेल्या कारभाराचा भांडा काही नागरीकांनी वास्तव न्युज लाईव्हच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या संदर्भाची छायाचित्र आणि चित्रफितीच्या माध्यमातून समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाला मात्र खडबडून जाग आली. पण हा कारभार कधी पासून चालतो याची माहिती प्रशासनाला असेलही पण तक्रार केल्यानंतरच जाग येते ही मात्र खेदजनक बाब आहे.
या उद्यानात असणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहिदांच्या स्मारकांच्या शेजारी व स्मारकावरही काही जणांनी वाढदिवस साजरा करून त्या ठिकाणची जागा घाण केली आणि या ठिकाणी वाढदिवसासाठी वापरण्यात येणारा केक व त्याचे साहित्य आस्थावेस्थ फेकून देण्यात आले. याचबरोबर काही नागरीकांनी डब्बा पार्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जेवनाचे साहित्य आणून त्यात चिकन, बियार्णी व इतर काही साहित्य तसेच पात्र असे साहित्ये या उद्यानात फेकून देेण्यात आले आणि याची सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याचे काही जणांनी सांगितले. याचबरोबर चिकन आणि बिर्याणी यातील काही हाडे ही जमीनवर टाकण्यात आली कारण या उद्यानात लहान बालकांसह वयोवृध्दही व अबाल वृध्द अणवाणी पायाने फिरत असतांना या हाडे पायात घुसले असते तर दुखापतही झाल्या असते. मात्र या घटना घडू नये म्हणून महापालिका प्रशासनाने अगोदरच कठोर भुमिका घेणे गरजेचे असतांना या घटनेचा सर्वत्र बोबाटा झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला याची जाग आली. या संदर्भात वास्तव न्युज लाईव्हच्या माध्यमातून सर्वांसमोर आणल्यानंतर महापालिका प्रशासनाने तात्काळ पाऊले उचल आता कोणालाही उद्यानात खाद्य पदार्थ घेवून जाता येणार नाही. तसेच वाढदिवसही साजरा करता येणार नाही अशा स्वरुपाचे आदेश रविवारी सुट्टीचा दिवस असतांनाही काढले आहेत. पण अशा घटना होवूच नये म्हणून त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली असती आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असते तर हा बाजार चव्हाट्यावर आला नसता आणि महापालिका प्रशासनाची नामुष्कीही झाली नसती.
संबंधीत बातमी…
Leave a Reply