नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाला मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. यामध्ये कौशल्य-आधारित अभ्यासक्रम सुरू करणे आणि विद्यार्थ्यांसाठी निर्बाध क्रेडिट हस्तांतरण सुलभ करण्यासाठी हा एक महत्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेचे सीईओ श्री नितीन के. पाटील (आयएएस) यांनी स्वाक्षरी केल्या.
हा सामंजस्य करार एक सहयोगी चौकट दर्शवितो जो उच्च शिक्षण अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क (NCrF) अंतर्गत क्रेडिट मान्यताच्या अतिरिक्त फायद्यासह प्रमाणित कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा पाठपुरावा करण्यास अनुमती देतो. हा उपक्रम ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ एनईपी-२०२० च्या अनुरूप आहे. जो समग्र आणि बहुविद्याशाखीय शिक्षणावर भर देणारा आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी या सामंजस्य कराराची प्रत महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मा. मंगल प्रभात लोढा यांना सुपूर्द केली.
यावेळी लोढा म्हणाले की, ‘कौशल्य विकास’ अभ्यासक्रमांना शैक्षणिक प्रणालीशी जोडून आम्ही तरुणांना अधिक रोजगारक्षम आणि उद्योजक बनण्यास प्रोत्साहित करणार आहोत. ज्यामुळे कार्यबलाच्या वाढत्या मागण्या पूर्ण होणार आहेत. भविष्यात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्वाचा आहे. अशी अशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
Leave a Reply