आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना नेहमी सांगायचे की, अतिरेक्यांचा प्रवेश रोखणे कोणाच्या हातात आहे, रुपया पडला तर जबाबदार कोण आहे, महागाई वाढली तर जबाबदार कोण? त्यांच्या मते तत्कालीन युपीएचे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ. आज याच प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारली तर ते उत्तर देतील की, नाही माहित नाही. बहुतेक देणारच नाहीत. कारण पहलगाममध्ये हल्ला झाला आणि ते तर बिहारच्या निवडणुकीचा धंदा करत आहेत. संत अभिमुक्तेश्र्वरानंदजी म्हणाले कोठे आहे चौकीदार, त्याने आपली जबाबदारी पुर्ण केली असती तर पहलगामचा हल्ला झाला नसता. पकडा मग चौकीदाराला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीचा धंदा बिहारमध्ये करत आहेत तर विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी कश्मिरला गेले. त्यांनी सांगितले की, देशात भावा-भावामध्ये भांडण लावण्याचा जे विचार पसरविला जात आहे. त्याला रोखण्यासाठी दमदार प्रयत्न करण्याची गरज आहे. मी आणि सर्व विरोधी पक्ष पहलगाम हल्ला संदर्भाने केंद्र सरकारसोबत उभे आहोत. खरे तर सर्वपक्षीय बैठक झाली तेंव्हा नरेंद्र मोदी हजर नव्हते. याबद्दल मल्लीकार्जुन खरगे सांगतात त्यांची अनुउपस्थिती भरपूर काही सांगणारी आहे. असाच चालणार आहे का देश? हीच आहे का ताकत देशाची ? अशीच असेल तर देशाची सुरक्षा आजही खुंटीला टांगलेलीच आहे.
पहलगाम हल्ला झाला. खरे तर त्या हल्यात मुंबईच्या हल्यातील हिरो तुकाराम ओंबळेसारखा खरा हिरो सय्यद हुसेन आहे. त्याने अतिरेक्याच्या हातातील रायफल हिसकावून घेतली होती. नाही तर अजून खंडी दोन खंडी पर्यटक मारले गेले असते. सय्यद हुसेनला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमी आहेत. त्या ठिकाणी मारले गेलेले 28 पर्यटक हे 140 कोटी देशाचे प्रतिनिधी आहेत. त्यात अधिकारी आहेत, व्यवसायीक आहेत, कामगार आहेत. कश्मिरमध्ये गुजरातच्या एका ठगाला झेड सुरक्षा देण्यात आली आहे आणि सर्वसामान्य माणसाची सुरक्षा खुंटीवर टांगली गेली आहे. म्हणूनच हा प्रकार घडला असा आरोप माजी थलसेना प्रमुख जनरल शंकरराव चौधरी यांनी केला. 1997 मध्ये ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या मते गुप्तहेर यंत्रणांचे अपयश ही या प्रकरणातील सर्वात जास्त चिंतेची बाब आहे. पाकिस्तानचा सेनाप्रमुख मुनिर आतकंवाद्यांना सांगतो काश्मिर पाकिस्तानच्या गळ्यातील धमनी आहे. यावर ब्रेन वॉश झालेले दहशतवादी तयार होतात आणि असे हल्ले करतात. याचप्रकरणात बोलतांना संत श्री स्वामी अभिमुक्तेश्र्वरानंदजी सांगतात कशासाठी तुमच्या हातात कारभार दिला होता. कुठे आहे चौकीदार त्याने आपली जबाबदारी पुर्ण केली असती तर पहलगाम हल्ला कसा घडला. पकडा मग चौकीदाराला. सिंधु नदीचे पाणी बंद केले तर पाकिस्तान पाण्याच्या थेंबाला तरसेल अशा खोट्या बातम्या प्रसारीत करून काय घडले. पाणी बंद करता येत नाही कारण तो अंतरराष्ट्रीय विषय आहे. एका संताला सुध्दा या अंतरराष्ट्रीय बाबीची माहिती आहे. मग उगीचच पाणी बंद करण्याच्या वल्गना करून काय साध्य करणार आणि काय त्यातून मिळणार.
आपला दुबई दौरा सोडून परत आलेले नरेंद्र मोदी बिहारच्या निवडणुकीचा धंदा करायला गेले. तर खा.राहुल गांधी काल शुक्रवारी सकाळी काश्मिरमध्ये पोहचले. त्यांनी जखमींची भेट घेतली, मरणाऱ्या व्यक्तींच्या कुटूंबांची भेट घेतली आणि सांगितले की, या देशात भावा-भावामध्ये भांडण लावण्याचा जो विचार मोठ्या ताकतीने पुढे आणला जात आहे. त्याला आम्ही एकत्रीतपणे रोखण्याची गरज आहे. मी मुख्यमंत्री उमरअब्दुला आणि उपराज्यपालांना भेटलो. त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली आणि आतंकवादी हल्याच्या बद्दल बोलतांना खा.राहुल गांधी म्हणाले गुप्तहेर यंत्रणा कशा चुकल्या. आलेल्या गुप्त माहितीमध्ये पहलगामचे नाव होते. मग त्याला गांभीर्याने का घेतले नाही. गुप्तहेर संघटनांचा आपसात संबंध नव्हता काय? दहशतवादी सिमा पार कसे आले. 28 मृत्यूंचा जबाबदार कोण? अशा प्रश्नांना उपस्थित केल्यानंतर असे दिसते की, डॉ.मनमोहनसिंघ सरकार असतांना हेच प्रश्न नरेंद्र मोदी विचारत होते. आता फक्त चुक झाली हे मान्य करून चालेल काय? मागील 11 वर्षांमध्ये नैतिकता या शब्दांची व्याख्या भारत जवळपास विसरला आहे. म्हणूनच आजच्या परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजीनामा देतील काय? या संजय राऊत यांच्या प्रश्नाला काही उत्तर नाही. कारण राजनाथसिंह यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, आम्ही किंवा आमचे मंत्री राजीनामा देणार नाही. युपीए सरकार असतांना जे प्रश्न नरेंद्र मोदींनी विचारले तेच प्रश्न आता त्यांच्या समोर उभे आहेत. त्याचे उत्तर द्या नरेंद्र मोदीजी पण दुबई दौरा सोडून आल्याचा कांगावा करण्यात आला. पण नरेंद्र मोदी तर बिहारच्या निवडणुकीत आहेत. पाकिस्तानच्या सेना अध्यक्ष मुनीर भारतात हिंदु-मुस्लिम वेगळे आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देशभरातील अनेक शहरांमध्ये धर्म विचारून गोळी मारली असे बॅनर लावून मुनीरचेच काम करत आहेत. एकंदरीतच आता या हल्याला पाचवा दिवस उजाडला आहे. एक महिला आपल्या मुलाखतीत सांगत होती पुलवामा सुध्दा निवडणुकीपुर्वीच घडला होता आणि पहलगाम सुध्दा निवडणुकीपुर्वीच घडला आहे असे का होत आहे या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे आहे. हिंदीमध्ये एक वाक्य आहे. दम मे दम आपण दम याच आधारावर आम्हाला जीवन जगायचे आहे काय?
Leave a Reply