नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील राज्य परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बसस्थानक तात्पुर्त्या स्वरुपात कौठा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या जागेवर स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याचे ग्रामीण पोलीसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रक यांना पत्र देवून या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा स्वरुपाचे पत्र देण्यात आले होते. मात्र या पत्राला राज्य परिवहन विभागाने केराची टोपली दाखवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी दि.16 एप्रिल 2025 रोजी राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांना पत्र देवून या ठिकाणी विद्युत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी. जेणे करून या ठिकाणी महामंडळाचे दररोज 1400 बसेस ये-जा करत असतात. तसेच 80 बसेस मुक्कामी थांबतात यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि विद्युत व्यवस्था करण्यात यावी. संपुर्ण परिसर विद्युत प्रकाशझोतात आले पाहिजे. प्रवाशांना चढ उतार करतांनाही लाईट आवश्यक आहे. ते मुख्य रस्त्यापर्यंत जाईपर्यंत. पण सध्या प्रवाशांना अंधारातच मुख्य रस्त्याकडे जावे लागत आहे. याचाा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अंधारामुळे लुटमार आणि चोरीच्या घटना घडू शकतात. तसेच महिला व मुलींची छेडछाड तसेच पुणे येथे घडलेल्या घटनेसारखा प्रकारही घडू शकतो. आमच्याकडे काही प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत.तसेच वरील काही बाबी आमच्या निर्दशनास आणून दिल्या आहेत. याचबरोबर या ठिकाणी पोलीस चौकी तयार करण्यासाठी खुर्च्या, पंखे व विद्युत लाईट यासाठी यांची व्यवस्था केल्यास योग्य राहील अशा स्वरुपाचे पत्र ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी राज्य परिवहन महामंडळाला देवून 10 दिवस उलटून गेले असले तरी अद्यापही या पत्राची दखल राज्य परिवहन महामंडळाने घेतली नसल्याने प्रवाशातूनही तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply