नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागात दिल्ली येथे नोकरी मिळवून देतो म्हणून काही युवकांकडून 1 कोटी 11 लाख 86 हजार रुपये फसवणूक करून घेण्यात आले आहेत.
गजानन बाबु जाधव रा.किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 एप्रिल 2024 ते 12 नोव्हेंबर 2024 दरम्यान बसस्थानक किनवट, डीआरएम कार्यालय नवी दिल्ली, उत्तर प्रदेशातील हापुड रेल्वे स्थानक येथे हरेंद्र भारती, आशिष पांडे या रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारांसह कट रचून गजानन जाधव आणि इतर युवकांना रेल्वे विभागात कमर्शिअल जागा आहेत. त्या आम्ही भरू शकतो असे सांगून त्यांच्याकडून 1 कोटी 11 लाख 86 हजार रुपये घेतले. रेल्वे विभागाच्या बनावट ईमेलवरून बनावट मेडिकल पत्र, बनावट जॉयनिंग पत्र तयार करून दिले आणि हापुड रेल्वे स्थानक उत्तर प्रदेश येथे हजेरी लावण्यास सांगितले. 20 युवक तेथे गेले त्यांनी तेथे हजेरी लावल्यानंतर हजेरी घेणाऱ्या माणसाने त्यांना उद्या या म्हणून सांगितले. त्यानंतर हे युवक 20 दिवस तेथे राहिले. पण कोणत्याही मुलाला प्रशिक्षण देण्यात आले नाही. पदावर नियुक्ती देण्यात आली नाही. नंतर आरोपींनी फोन बंद केल्यामुळे युवकांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली. मग त्यांनी तक्रार दिली. किनवट पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 177/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक चोपडे हे करणार आहेत.
Leave a Reply