नांदेड(प्रतिनिधी)-जम्मू-काश्मिर येथील पहलगाम येथील आतंकवाद्यांकडून पर्यटकांवर बेझुड गोळीबार 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेने संपुर्ण देशात पाकिस्तान विरोधी तिव्र भावना निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ दि.25 रोज शुक्रवारी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला सर्वसामान्य नागरीकांबरोबरच व्यापाऱ्यांनीही आपले दुकाने बंद ठेवून या घटनेचा तिव्र निेषध व्यक्त करत रस्त्यावर उतरले होते.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता वर्कशॉप कॉर्नर येथून मोटारसायकल रॅली काढत नंादेड शहरातील मुख्य रस्त्याने ही रॅली निघाली होती. शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला. याच बरोबर आयटीआय चौकात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन करण्यात आले. या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात अनेकांनी खून जबाब खून से देंगे, निम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है, पाकिस्तान मुडदाबाद अशा घोषणा देवून पाकिस्तानविरोधी नागरीकांनी तिव्र संताप व्यक्त केला. या बंदमध्ये माजी आ.अमरनाथ राजूरकर, बाळू खोमणे, शिवसेना प्रमुख बबन बारसे, कैलास सावते, गौतम जैन यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला होता.
Leave a Reply