Advertisement

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे खरे टार्गेट अमरनाथ यात्रा होती


पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे मुख्य टार्गेट पहलगामच होते. परंतू जुलैमध्ये सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्यावेळी परंतू अतिरेक्यांनी 22 एप्रिल रोजी तेथे जमलेल्या पर्यटकांची गर्दी पाहुन त्याच दिवशी हल्ला केला असे सांगतात आज उधमसिंघनगर येथे पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना सुरक्षा यंत्रणांनी घेरले आहे आणि तेथे चकमक सुरू आहे. लवकरात लवकर या अतिरेक्यांना मारण्यापेक्षा जीवंत पकडून सत्य भारतासमोर मांडले गेले पाहिजे तरच या मागे काही खेळ नव्हता हे निश्चित होईल नाही तर या मागे सुध्दा खेळ होता याच विषयाला कोणी बदलू शकणार नाही.


22एप्रिल 2025 रोजी कश्मिरच्या सरगंगाराम दवाखान्यात डॉक्टर, नर्स, तेथील सफाई कामगार, इतर तांत्रिक व्यक्ती, ऍम्युलन्स चालक या सर्वांची घाई अशी होती की, त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक जखमीचा जिव त्यांना वाचवायचा होता. त्या ठिकाणी काही नवीन लग्न झालेल्या जोड्या होत्या. काहींनी पहिल्यांदा कश्मिरमध्ये पाय ठेवला होता. काही जणांचे स्वप्न होते. कश्मिर पाहण्याचे आणि या सर्वांवर कांडी फिरवली आतंकवाद्यांनी. जे 28 पर्यटक मरण पावले त्यांचा विषय संपला असे मानू. परंतू ते जगलेले आहेत, जखमी आहेत. ते आपल्या मृत्यूपर्यंत 22 एप्रिल 2025 हा दिवस विसरणार नाहीत. काही पर्यटकांनी अतिरेक्यांशी बोलून लावलेल्या अंदाजाप्रमाणे त्यांनी आपला जीव वाचवला. काही जणांना स्थानिक कश्मिरी मुस्लिम लोकांनी मदत केली. स्थानिक लोक आज अतिरेक्यांना शिव्या देत आहेत. कारण या घटनेमुळे त्यांचा व्यवसाय आता बुडालाच आहे.
30 वर्षाअगोदर सुध्दा असेच घडले होते. ती तारीख 4 जुलै 1995 होती. याच पहलगाममध्ये 41 अतिरेकी आले आणि त्यांनी दोन अमेरिकन, दोन ब्रिटीश, एक जर्मन विद्यार्थी, एक नॉर्वेचा अभिनेता आणि त्यांचे दोन गाईड अशा सहा लोकांना बंदुकीच्या धाकावर अपहरण करून नेले. त्यावेळी जैशचा कमांडर मौलाना मसुद अजहर तुरूंगात होता. त्याला सोडविण्यासाठी ते अपहरण झाले होते. तो त्याला सोडविण्याचा पहिला प्रयत्न होता. पुढे मसुद अजहरला अफगाणिस्थानच्या कंधारमध्ये नेऊन सोडण्यात आले होते. अपहरणानंतर 13 ऑगस्ट 2025 रोजी नॉर्वेचे अभिनेता हॅन्स क्रिश्चन ऑस्ट्रो यांचे प्रेत पहलगामजवळ मिळाले. पण ते प्रेत धडच होते. त्यांचे डोके दुसरीकडे सापडले. त्या सहा पैकी एक मारला गेला होता. त्यानंतर 17 ऑगस्ट 1995 रोजी अमेरिकेचा पर्यटक जॉन किल्स हा अतिरेक्यांच्या तावडीतून पळून आला. आता शिल्लक चार राहिले. त्यानंतर अतिरेक्यांनी आम्ही सरकारशी बोलणार नाही अशी भुमिका घेतली. आज सन 2025 सुरू आहे. आजपर्यंत सुध्दा त्या उर्वरीत चार लोकांचे काय झाले. हे कोणालाच माहित नाही, कोणीच सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्या अपहरणानंतर तेथील घनदाट जंगल अनंतनाग जिल्ह्यापर्यंत शोधण्यात आले पण काही उपयोग झाला नाही. आता 30 वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी पाच-सहा अतिरेक्यांनी गडबड केली आहे. पहलगामची सुंदरता पाहण्यासारखी आहे. त्यामुळेच तेथे पर्यटकांचा ओढा जास्त असतो. अतिरेक्यांसाठी थंडीत तेथे पडणारी बर्फ त्यांना भारतात प्रवेश करण्यासाठी मदत करते आणि आता फेबु्रवारीमध्ये उन्हाळा सुरू झाला की ते पुन्हा जंगलात येतात. त्यांना 10 मिनिटात 1 किलो मिटर जंगल मार्गात चालता येईल असे प्रशिक्षण दिले जाते.


पहलगाम हल्यासाठी तीन जण पाकिस्तानातून आणि दोन जण स्थानिक कश्मिरी असे पाच आतंकवादी आहेत. पाकिस्तानमधून आलेल्या तिघांची नावे अबु तलहा, आसीफ फौजी, सुलेमान शाह अशी आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2024 मध्ये हे तिघे आपल्या स्थानिक मदतगारांसह भारतात आले. ते ताल या भागात लपले. त्यावेळी एका भुयारात सात जणांची हत्या करण्यात आली होती. तो हल्ला सुध्दा याच पाच जणांनी केल्याची शंका आहे. पहलगाम हल्याची जबाबदारी टीआरएफ (द रिजिड फोर्स) ने घेतली आहे. या फोर्सचा कमांडर शेख सज्याद आहे. भारताने 370 कलम रद्द केल्यानंतर सन 2019 मध्ये या टीआरएफची स्थापना झाली. सोशल मिडीयाद्वारे कश्मिरी युवकांना भडकाविण्याचे काम टीआरएफ करत असते आणि ते आजपर्यंत सुरू आहे.
खरे तर या अतिरेक्यांचे खरे टार्गेट जुलै 2025 मध्ये सुरू होणारी अमरनाथ यात्रा होती. कारण अमरनाथ यात्रेचा बेसकॅम्प पहलगाम येथेच असतो. परंतू उन्हाळा सुरू झाल्यानंतर टेकड्यांवरून खाली आलेल्या अतिरेक्यांनी 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहलगाम येथील मिनी सिव्हर्झलॅन्डची रेखी केली आणि या रेखीदरम्यान पर्यटकांची मोठी उपस्थिती त्यांच्यासाठी नवीन टार्गेट झाली आणि त्यांनी 22 एप्रिल रोजी हा हल्ला केला. मागील अनेक वर्षापासून या भागात अतिरेकी हालचाल शुन्य आहे. म्हणून सुरक्षा यंत्रणांचे त्या भागाकडे दुर्लक्ष असेल. तसेच 1995 नंतर आजपर्यंत पर्यटकांना कधी टार्गेट करण्यात आले नाही. पर्यटकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे आणि स्थानिक कश्मिरी लोकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे 5 पैकी 3 हे पाकिस्तानचे अतिरेकी आहेत. कारण ते ज्या पध्दतीची भाषा बोलत होते. ती उर्दु पाकिस्तानमध्येच बोलली जाते आणि दुसरे दोन हे त्यांचे स्थानिक मार्गदर्शक होते. हे तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी त्यांच्या भाषेवरून ओळखले.

पहलगाममधला हल्ला यासाठी निवडला गेला असेल की, त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांची वाहने गती घेवून येवू शकत नाहीत आणि मागे खुप मोठे घनदाट जंगल हजारो किलो मिटर आहे. त्यांना पळून जाण्यासाठी ती सुविधा आहे. एका महिलेने पहलगामच्या त्या गोळीबार झालेल्या जागेअगोदर ज्याला बॅसरन घाटी म्हणतात तेथे जाण्याच्या तयारीत असतांना तिला भेटून बोलणाऱ्या एका अतिरेक्याचा फोटो घेतला. त्याच्या बोलण्यावरून त्या महिला एकता यांना शंका आली. त्याचवेळी त्याच्याकडे फोन आला. फोनवर तो बंदुकांविषयी बोलत होता. एकता यांना विचारत होता तुम्ही हिंदु आहात की, मुस्लिम, तुम्हाला कुराण वाचता येते काय तेंव्हा एकताने आपल्या सोबतच्या 20 पैकी एकाला सांगितले लाईव्ह व्हिडीओ सुरू करा. तेंव्हा तो निघून गेला. त्यानंतर अतिरेक्यांनी 10 मिनिटे गोळीबार केला आणि 10 मिनिटांनंतर ते टेकडीवर चढून गेले.
काही लोक सांगतात की, पाकिस्तानसोबत एकदाच सोक्ष मोक्ष होवू द्या. पण हे अवघड आहे. कारण भारत पाकिस्तानची सिमा 600 किलो मिटर आहे. एखाद्या घाणेरड्या शेजाऱ्यासोबत राहतांना सुध्दा त्याच्याशी संपुर्ण संबंध समाप्त करता येत नाहीत. कारण 24 एप्रिल रोजी भारताची एक सैनिक पाकिस्तान रेंजर्सनी पकडला. तो चुकीने पाकिस्तान सिमेत गेला होता. सध्या त्या सैनिकाला सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. पाकिस्तान आणि भारत दोघेही युनायटेड नेशनचे सदस् य आहेत. त्यामुळे सुध्दा अनेक बंधने आहेत. दोघांकडे परमाणु बॉम्ब आहे. हा धोका दोघांसाठी आहे. प्रश्न हा आहे की, अतिरेक्यांनी पहलगामचा हल्ला कोणावर केला. खरा हा हल्ला स्थानिक कश्मिरी लोकांवर झालेला आहे. कारण त्यांच्या पर्यटन व्यवसाय समाप्त होईल आणि त्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे होतील. हाच आहे का जिहाद आणि कोणाविरुध्द करत आहात याचे तर डोके करणाऱ्यांना नाहीच. अशा कोणत्याही घटनेत मानवतेच्या प्रक्रियेत सुध्दा क्षमा देता येणार नाही असा घटनाक्रम अतिरेक्यांनी घडविला आहे. अशा लोकांना मानव म्हणणे सुध्दा मानवतेचा अपमान आहे. आज सांगितले जात आहे की, सुरक्षा रक्षकांनी पहलगामच्या टेकड्यांवर पळालेल्या अतिरेक्यांना उदमसिंघनगर या जिल्ह्याच्या जंगलात घेरण्यात आले आहे. आमच्या मते त्यांना मारुन टाकण्याऐवजी जीवंत पकडायला हवे. जेणे करून या घटनेमागचा खरा खेळ उघडकीस येईल.


Post Views: 217






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?