नांदेड(प्रतिनिधी)- सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी सरपंच पदाचे आरक्षण प्राधिकृत अधिकारी तहसीलदार नांदेड यांनी आज जाहीर केले आहे.
सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी नांदेड तालुक्यातील वेगवेगळ्या ग्राम पंचायतींमध्ये सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यात अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी 9 आरक्षण आहेत आणि अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी 9 आरक्षण आहेत. अनुसूचित जाती पुरूष या प्रवर्गासाठी मार्कंड, खुपसरवाडी, राहेगाव, पोखर्णी, धानोरा, बळीरामपुर, पिंपरी महिपाल, नाळेश्र्वर आणि जैतापूर या गावांमध्ये आरक्षण आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी गाडेगाव, बाभुळगावा, पुयणी, नागापूर/ सत्तारपुर, किकी, वाजेगाव/ इलिचपुर, सुगाव (बु), भनगी आणि कोटतिर्थ, अनुसूचित जमातीसाठी पुरूष या प्रवर्गात आरक्षण निरंक आहे. अनुसूचित जमाती महिलांसाठी गोपाळचावडी ही ग्रामपंचायत सुरक्षीत ठेवण्यात आली आहे.
मागासप्रवर्गासाठी 17 आरक्षण आहेत. त्यामध्ये 8 पुरूष वर्गासाठी आहेत. ज्यात खडकुत/ यमशेटवाडी, वाडी (बु), चिखली (बु), निळा, वडगाव, वडवणा/ खडकी, कासारखेडा, गंगाबेट, मागासप्रवर्गातील महिलांसाठी सिध्दनाथ, नेरली, फत्तेपुर, चिमेगाव, बोंढार तर्फे नेरली, बोरगाव तेलंग, पिंपळगाव मिस्त्री, धनेगाव/मुजामपेठ, धनगरवाडी.
खुल्या प्रवर्गासाठी 37 सरपंच आरक्षीत आहेत. त्या गावांची नावे पुढील प्रमाणे आहेत. एकदरा, पासदगाव/ पासदगाव तर्फे काकांडी, भायेगाव, खुरगाव, चिखली (खु), आलेगाव, थुगाव, दर्यापुर, गुंडेगाव, तळणी, नांदुसा/ भालकी, ब्राम्हणवाडा, इंजेगाव, विष्णुपूरी, पांगरी, लिंबगाव, कामठा (खु), सुगाव (खु), वांगी/ वाडी करडेल, तुप्पा, पुणेगाव, नसरतपुर / हस्सापुर, वाघी, रहाटी (बु), पिंपरगाव कोरका, ढोकी, सायाळ, बोंढार तर्फे हवेली, कल्हाळ, काकांडी तर्फे तुप्पा, त्रिकुट/ वाडी झांजी, सोमेश्र्वर, वाहेगाव, वानेगाव/वरखेड /भानपूर, मरळक (बु)/मरळक (खु), पिंपळगाव निमजी आणि वाडी पुयड.
नांदेड तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर – VastavNEWSLive.com

Leave a Reply