इस्लापूर (प्रतिनिधी)- नांदेड-भरधाव वेगात असलेल्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात एक ट्रक पुलावरून खाली कोसळला तर दुसरा ट्रक फुलाच्या काठावर अडकलाय.या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. तर तिघे जण गंभीर जखमी झाले.ही घटना नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील इस्लापूर जवळील हरणखरब खोलनाला पुलावर घडली.
पुसद येथील गाडी मालक ईश्वर कोल्हे वय 37 , मंगेश पवार वय 28, नागनाथ बुटले वय 30 हे तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत यांना इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे
तर किनवट तालुक्यातील पांगरी येथील शंकर गणेश मुतकूलवाड वय 32 वर्ष याच्या डोक्याला जबर मार लागल्याने याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरील घटनेची माहिती मिळताच इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले आणि रमेश चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले.एम एच 26 एडी 3151 या क्रमांकाचा ट्रक सोयाबीन घेऊन किनवट कडे जात होता तर एम एच 17 बी वाय 7868 या क्रमांकाचा ट्रक मका घेऊन नांदेड कडे जात होता या दोन्ही क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने एमएच 26 एडी 3151 या क्रमांकाचा ट्रक पुलावरून 25 ते 30 फूट खोल नाल्यात कोसळला तर एम एच 17 7868 या क्रमांकाचा ट्रक पुलाच्या काठावर अडकला या दोन्ही मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. इस्लापूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील हरण खरब खोलनाल्यावर हा फुल असून आणि वळण रस्ता आणि चढ असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही आणि या राष्ट्रीय महामार्गावर अपघात स्थळ असल्याचे कुठलेही नामपलक नाही तर त्याच बरोबर या फुलावर गेल्या अनेक वर्षापासून सुरक्षा कठडे बांधलेले नाही किंवा पुलाच्या कडेला लोखंडी पाईप देखील लावलेले नाही त्यामुळे या पुलावरून अनेक वाहने अपघात होऊन खोल नाल्यात कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
Leave a Reply