नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्कॉडमधील अधिकाऱ्यांनी कंधार आणि लोह्यातील काही महाविद्यालयांना परीक्षे दरम्यान अचानक भेटी दिल्या. यामध्ये १२ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. त्यांच्यावर गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यात आली.
विद्यापीठातील कॉपी पकडणाऱ्या पथकांनी दि. २५ एप्रिल रोजी अचानक कंधार येथील विधी महाविद्यालय, बाळंतवाडी येथील एसआरटी अध्यापक महाविद्यालय, लोहा येथील संत गाडगेबाबा महाविद्यालय आणि बीएड महाविद्यालय या महाविद्यालयांना भेटी दिल्या. याभेटी दरम्यान १२ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. त्याच्यावर गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
या पथकामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्यासह विशेष कार्यासन अधिकारी डॉ. डी.एम. नेटके, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, प्राचार्य शेखर घुंगुरवार यांचा समावेश होता.
Leave a Reply