नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी येथील घरफोडून चोरट्यांनी 60 हजार 100 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथून एका सेवानिवृत्त शिक्षकाचे 60 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत.
पंढरीनाथ रामचंद्र आमेठवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास त्यांनी आपले कुंभार गल्ली कुंडलवाडी येथील घर बंद करून त्यास कुलूप लावून पाहुण्यांच्या लग्नासाठी बाहेर गावी गेले होते. 23 एप्रिल रोजी ते परत आले तेंव्हा त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले होते. तपासणी केली असता सोन्याचे दागिणे आणि घरातील पितळी धातुचे भांडे असा 60 हजार 100 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. कुंडलवाडी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 75/2025 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.
सेवानिवृत्त शिक्षक विश्र्वंभर जगजेराव कदम (64) हे 24 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथे चेक जमा करण्यासाठी गेले. त्यावेळी ते चेकची पावती भरत असतांना त्यांच्या बाजूला ठेवलेल्या त्यांच्या काळ्या रंगाच्या बॅगमधून 60 हजार रुपये एका अनोळखी महिलेने चोरून नेले आहे. नायगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 76/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक तोटेवाड अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply