नांदेड–सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी विविध मागण्यांच्या अनुषंगाने बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत आयुक्त राज्य सेवा हक्क आयोग छत्रपती संभाजीनगर यांना दिले आहे.
या निवेदनातील एकूण १६ मागण्यांच्या अनुषंगाने बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने सोमवार दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सेवा हक्क दिनीच जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शेकडो दिव्यांगांसह आमच्यासाठी कुठल्याच सेवा हक्क नाहित का “जवाब दो” म्हणत एकापेक्षा अनेक प्रकारचे तिव्र ते अति तिव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार आहे, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी,समाज कल्याण अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, बॅंक मॅनेजर, वन अधिकारी यासह संबंधित सर्वांनाच घेराव घातला जाणार आहे. तसेच न्याय न मिळाल्यास १ में महाराष्ट्र दिनी नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्या कार्यालयात, निवासस्थानी, कार्यक्रमात, बैठकीत आक्रोश मोर्चा काढुन एकापेक्षा अनेक प्रकारचे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हणत यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा घडविल्यास यास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहणार आहे अशा आशयाचे निवेदन बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे, उपाध्यक्ष आदित्य पाटील, युवा अध्यक्ष कार्तिक कुमार भरतिपुरम आणि शहराध्यक्ष सय्यद आरिफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, पोलिस अधीक्षक कार्यालय नांदेड आणि वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड येथे आज दिले आहे.
Leave a Reply