नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या झेरॉक्स दुकानांमध्ये मुल्यांकन पत्र व इतर अनेक प्रकारचे चालन शुल्क ऑनलाईन भरलेले पत्र काढून देण्याचे काम होते. ऑनलाईन शुल्क वगळता त्याची फिस मनमानी कोणतेही दरपत्रक दुकानात लावलेले नसतांना 50 रुपये प्रत्येक चलनाप्रमाणे वसुल करून जनतेची लुट होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे नागरीक नासेर अलीखान पठाण यांनी केली आहे.
नासेर अली खान जब्बारखान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पिरबुऱ्हाननगर भागातील गल्ली क्रमांक 12 मध्ये घर आहे. ज्याचा भुमापन क्रमांक 57 आहे. भुखंड क्रमांक 103 आहे. त्याचे एकूण क्षेत्र 48.80 चौरस मिटर आहे. महानगरपालिकेतील मालमत्ता क्रमांक 157 आहे. त्याचे खरेदी खत क्रमांक 2178/1993 असे आहे. याबाबतचे मुल्यांकन पत्र काढण्यासाठी मी 22 एप्रिल रोजी सहजिल्हा निबंधक वर्ग-1 कार्यालयात गेलो असतांना खरेदी खत घेवून खरेदी खतावर 100 रुपयांचा आकडा लिहुन मला त्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या झेरॉक्स दुकानात पाठविण्यात आले. त्या दुकानदाराने 100 रुपयांचे चालन काढून दिले आणि त्यासाठी वेगळे 50 रुपये शुल्क घेतले. त्यावेळी विचारणा केली तेंव्हा तो दुकानदार म्हणाला येथे हजारो लोक येतात. आम्ही 50 रुपये प्रत्येकाकडून घेत असता.
मुल्यांकन पत्र मला प्राप्त झाले परंतू सहजिल्हा निबंधक वर्ग-1 या कार्यालयात ऑनलाईन व्यवस्था नसल्यामुळे बाहेरचे झेरॉक्स दुकानदार मनमानी कारभार करतात. शासकीय किंमत घेवून वेगळे 50 रुपये बळजबरीने आकारतात. जिल्हा निबंधक कार्यालयाने या संदर्भाची एक नियमावली तयार करून अतिरिक्त शुल्काची रक्कम स्वत: सुनिश्चित करावी जेणे करून तेथे येणाऱ्या लोकांची लुट होणार नाही. तसेच सहजिल्हा निबंधक कार्यालयाच्या शेजारी असलेल्या झेरॉक्स दुकानदारांविरुध्द योग्य का र्यवाही करावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.
Leave a Reply