एकाच कंत्राटदाराला 400 कोटी मेहरबानी करणाऱ्या कार्यकारी अभियंता प्रशांत कोरेंच्या निलंबनाची मागणी
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने विशेष सहाय्य योजनेनुसार कंत्राटदारांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना 12 मार्च 2025 रोजी जारी केली. त्यानंतर सध्या एप्रिल महिना सुरू आहे. तो एप्रिल महिला पुर्ण होण्याअगोदरच नांदेडमधील शारदा कंस्ट्रक्शन या एकाच कंत्राटदाराला जिल्ह्यातील वेगवेगळ्या कामांसाठी 317 कोटी 57 लाख 52 हजार 337 रुपये देण्यात आले आहे. या सर्व कारभारामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांनी केलेला हा बेकायदेशीर खेळ त्यांना निलंबित करून रोखा आणि त्रिसदस्यी समितीच्या मार्फत या कोट्यावधी रुपयांचा घोळ चौकशी करून त्याविरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही करावी असा अर्ज धर्मविर आनंद दिघे विचार मंचचे अध्यक्ष पवन बोरा (शर्मा) यांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना दिला आहे. तसेच या अर्जाच्या प्रति राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही दिल्या आहेत.
दि.12 मार्च 2025 रोजी शासनाने एक परिपत्रक जारी केले. ज्यामध्ये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत रस्त्याची कामे, वळण रस्ते, उड्डाणपुल आदींचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना त्या कामात गती यावी यासाठी बिनव्याजी कर्ज देण्याची योजना तयार केली. परंतू या योजनेचा दुरूपयोग होण्याची सुरूवात लगेच झाली.महाराष्ट्रात नामांकित असलेली कंत्राटदार संस्था शारदा कंस्ट्रक्शनला नांदेड जिल्ह्यातील विविध कामांसाठी एकूण 317 कोटी 57 लाख 52 हजार 337 रुपये एवढी मोठी रक्कम बिनव्याजी कर्जाने दिली आहे. याचा अर्थ असाच होतो की, शासनाचे अर्थात सर्वसामान्य जनतेचे पैसे घेवून या कंत्राटदारांनी ते काम करावे आणि फुकटात नफा कमवावा. ही मेहरबानी नांदेड जिल्ह्यात फक्त शारदा कंस्ट्रक्शनवरच का? नांदेड जिल्ह्यात शारदा कंस्ट्रक्शन ही एकच कंपनी आहे. मग त्यांनाच या विशेष सहाय योजनेचा लाभ का देण्यात आला. यामागे सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांचा खेळ असल्याचा आरोप पवन बोरा यांनी केला आहे.
शारदा कंस्ट्रक्शनला 1360 कोटी रुपयांची कामे मंजुर करण्यात आली आहेत. त्यापैकी भोकर विभागात 3 कामे 400 कोटींची आहेत आणि त्या 400 कोटीच्या कामांसाठी 317 कोटी 57 लाख 52 हजार 337 रुपये अग्रीम देण्यात आले आहे. त्या कामांमध्ये पुर्णा-मालेगाव रोड ते हिंगोली रस्ता, राज्य महामहामार्ग क्रमंाक 247. भुसंपादन महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 7521 चौंडी कुरूंदा ते मालेगाव तरोडा. पश्चिम वळण रस्ता राज्य महामार्ग क्रमांक 247 वरचे काम. गोदावरी नदीवर असलेल्या पुलाजवळ तयार होणारा पश्चिमम वळण रस्त्याचे काम असे अनेक आठ कामांचा उल्लेख पवन बोरा यांनी आपल्या अर्जात केला आहे. 1360 कोटी रुपयांपैकी 400 कोटी एकाच कंत्राटदाराला देण्या मागचे काय कारण आहे. हे शोधण्याची गरज पवन बोरा यांनी आपल्या अर्जात नमुद केली आहे.
एखाद्या कामांसाठी जेंव्हा शासन पैसे देते त्या कामाचे खाते पाहाणे ही जबाबदारी सुध्दा शासनाची आहे. दिलेल्या कामासाठीच ते पैसे खर्च झाले आहेत. काय, किंवा पैसांचा दुसऱ्या कामासाठी उपयोग केला आहे काय याचाही शोध व्हावा म्हणून कार्यकारी अभियंता प्रशात कोरे यांना निलंबित करावे., तसेच त्रिसदस्यी समिती स्थापन करून या 400 कोटीचा घोळा जनतेसाठी खुला करावा नाही तर मुंबई येथील आझाद मैदानात आम्ही उपोषण करू असा इशारा यात देण्यात आला आहे.
Leave a Reply