नांदेड(प्रतिनिधी)-महामार्ग सुरक्षा पथक बारड यांनी एका चार चाकी गाडीत जाणारी चोरटी दारु वाहतुक पकडून देशी दारुच्या 480 बॉटल्या, 10 बॉक्स आणि देशी दारुच्या दुसऱ्या नावाच्या 500 बॉटल्या असे एकूण 15 बॉक्स दारुसह दारुची चोरटी वाहतुक करणारी चार चाकी गाडी असा एकूण 2 लाख 81 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बारड महामार्ग सुरक्षा पथकातील पोलीस अंमलदार अरविंद प्रकाशराव इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजेपासून 24 एप्रिलच्या पहाटे 8 वाजेपर्यंत त्यांची कर्तव्य अंमलदार म्हणून डियुटी असतांना या कालखंडात नागरिक प्रल्हाद शिंदे यांनी त्यांना दुरध्वनीवरून कळविले की, बारड शहरातील गतिरोधकाजवळून एक चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.सी.एक्स.5964 खांबाला घासून भोकरकडे भरधाव वेगात येत आहे. तेंव्हा महामार्ग सुरक्षा पथकातील इतर पोलीस अंमलदार वागदकर, श्रीमंगले, पाचपुळे, बालाजी हिंगनकर, जोगदंड यांनी महामार्ग सुरक्षा पथाकासमोर बॅरीकेट लावून त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला. तरी पण ते वाहन पळून गेले. तेेंव्हा महामार्ग सुरक्षा पथाकातील पोलीस अंमलदारांनी आपल्या सरकारी वाहनाने पळून गेलेले वाहन क्रमांक 5964 चा पाठलाग केला. पोलीसांनी शेंबोली गा वापर्यंत त्याचा पाठलाग करून अखेर त्याला रोखलेच. त्याला विचारणा केली की, थांबण्याचा इशारा केला असतांना तु का पळाला. याचे उत्तर तो देवू शकला नाही. तेंव्हा पोलीसांनी चार चाकी गाडीची तपासणी केली. त्यात आरोपी: ओंमकार शंकर नरोटे वय 19 वर्ष रा. रामनगर अर्धापूर व एकूण 980 देशी दारुच्या बॉटल सापडल्या. त्याची एकूण किंमत 51 हजार 100 रुपये तसेच चार चाकी वाहनाची किंमत 2 लाख 30 हजार रुपये असा एकूण 2 लाख 81 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या बाबतची फिर्याद बारड महामार्ग सुरक्षा पथकाने पोलीस ठाणे बारड येथे दिली आहे. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बारड महामार्ग सुरक्षा पथकाने 51 हजारांची देशी दारु पकडली

Leave a Reply