नांदेड(प्रतिनिधी)-सध्या बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. त्यात विशेष करून ज्या पदांना महत्व असते. त्यासाठी अगोदर नांदेड जिल्हा हा केंद्र होते. पण आता ते केंद्र छत्रपती संभाजीनगर झाले असतांना सुध्दा छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील अधिकारी नांदेड जिल्ह्यातील काही जुन्या मात्तबर, हुरहुन्नरी वर्दीधारी अधिकारी आणि वर्दीधारी कर्मचाऱ्यांना साथीला घेवून नांदेडमध्ये बदल्या, तोड्या या संदर्भाने काम काज सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांना सुध्दा याची माहिती मिळाली पाहिजे. कारण त्यांच्या आस्थापनेवरील वर्दीधारी अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यात काय कामकाज करतो. हे त्यांना माहित असायला हवे आणि त्यांनी परवानगी दिली असेल तर मग काय? सय्या भऐ कोतवाल अब डर का हे का।
नांदेड जिल्ह्यातील वर्दीधारी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे बदलीचे केंद्र तयार झाले होते. परंतू काही कारणाने हे केंद्र छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात बदलून गेले. तेथे हजेरी लावून हे केंद्र पुन्हा एकदा नांदेडमध्येच कार्यरत आहे असे दिसते. कारण अनेक जागी असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या केंद्राचे चित्र जमा होत आहेत. ते वजिराबाद असेल, शासकीय निवासस्थाने असतील, बाबानगर असेल या सर्व भागांमध्ये अनेक जागी सीसीटीव्ही फुटेज आहेतच. त्यात त्या बदली केंद्राचे येणे-जाणे नोंद होतच असणार. असेच मागे पण घडले होते.
या बदली केंद्राने नांदेडमध्ये नव्याने जिल्ह्यातील बदल्या, जिल्ह्यातील तोड्या यांच्यावर आता लक्ष केंद्रीत केले आहे आणि त्याच्या मदतीसाठी दहा वर्षापुर्वीच्या पोलीस प्रमुखांचे हस्तक असलेल्या एका वर्दीधारी अधिकाऱ्याला आपल्या साथीला घेतले आहे म्हणे. सोबतच विदेशात बसून भारतात वेगवेगळे गुन्हे घडविणाऱ्या एका महत्वपुर्ण व्यक्तीच्या प्रकरणांमध्ये नाव असलेला एक वर्दीधारी कर्मचारी सुध्दा बदली केंद्राच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे असेच चालत असते काय लोकशाहीत, हीच लोकशाहीची व्याख्या आहे काय? जे काम बदली केंद्राला येते ते काम प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असलेला वर्दीधारी अधिकारी आणि वर्दीधारी कर्मचारी करू शकतो. मग त्या एकावरच जबाबदारी का? जे सध्या नांदेड जिल्ह्याच्या आस्थापनेवर सुध्दा नाहीत. जी जुनी नावे आम्ही उल्लेखीत केली आहेत ती तर पीएचडी पदवी घेण्यासाठी उत्कृष्ट आर्टीकल आहेत.
सध्या राज्यात, जिल्ह्यात बदलीचे वारे वाहत आहे. या वाऱ्यामध्ये काही कर्मचारी तर साहेबांचे आता काही नाही त्यांची बदली होणार आहे असे सांगून फक्त आपल्या भाकरीवर तुप ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना किंबहुना साहेबांना का हे कळत नाही. हा सुध्दा एक महत्वाचा शोध विषय होवू शकतो.
Leave a Reply