नांदेड(प्रतिनिधी)-एका सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 30 वर्षीय नराधमाला नांदेड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी अत्यंत कडक शिक्षा दिल्या आहेत. वेगवेगळ्या कलमान्वये झालेल्या शिक्षा 60 वर्षाच्या होतात परंतू या सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. म्हणून 20 वर्ष सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंड असे या शिक्षेचे स्वरुप आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 25 वर्षीय आईने दिलेल्या तक्रारीनुसार 20 सप्टेंबर 2023 रोजी शाळेतून आलेली बालिका राजे छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात खेळण्यासाठी गेली. काही वेळानंतर ती अल्पवयीन सहा वर्षाची बालिका रडत घरी आली असता आईने आणि आजीने याची विचारणा केली. तेंव्हा बाळू अंकलने आपल्यासोबत काय काय केले त्याची सर्व हकीकत सांगितली. त्याने गणपती मंडपातून त्या बालिकेला उचलून आपल्या घरात नेले होते. बालिकेने सांगितलेली हकीकीत बातमीत लिहिण्याची ताकत आमच्यात सुध्दा नाही. परंतू तिच्यावर कायद्याच्या शब्दात त्या नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 376(एबी), पोक्सो कायद्याचे कलम 4, 6 आणि 8 नुसार गुन्हा क्रमांक 680/2023 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे यांनी केला. या प्रकरणातील गुन्हेगार बालाजी माधवराव व्हंडे (30) यास अटक करण्यात आली आणि त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
जिल्हा न्यायालयात हा विशेष पोक्सो खटला क्रमांक 154/2023 नुसार चालला. या खटल्यादरम्यान 8 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. ज्यात त्या बालिकेची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष सुध्दा महत्वपुर्ण आहे. या खटल्यातील एफआयआरप्रमाणे एक-एक शब्दाचा उल्लेख करून या प्रकरणात किती गांभीर्यपुर्ण प्रकार घडला आहे याचे सादरीकरण सहायक सहकारी वकील ऍड.एम.ए.बत्तुल्ला(डांगे) यांनी केले. एकंदरीतच या बालिकेसोबत घडलेला प्रकार हा शिक्षा देण्यास योग्यच आहे. ही बाब न्यायालयासक्षम ऍड.बत्तुल्ला यांनी मांडली आणि न्यायालयाने ती मान्य केली. या प्रकरणातील पोक्सो कायद्यातील कलम 4, 6 आणि 8 या प्रत्येकामध्ये 20 वर्ष सक्तमजुरी आणि एकूण 25 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी अल्पवयीन बालिकेवर अन्याय करणारा बालाजी माधवराव व्हंडे (30) यास ठोठावली आहे. दिलेल्या सर्व शिक्षा एकत्रीत भोगाच्या आहेत. म्हणजे ही शिक्षा 20 वर्ष सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये रोख दंड अशी होती. दंडाची 25 हजार रुपये रक्कम पिडीत बालिकेला तिच्या पालकामार्फत देण्यात यावी असे आदेश न्या.सुनिल वेदपाठक यांनी केले आहेत. या खटल्यात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार रवि संकुरवार यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.
Leave a Reply