भारतात सध्या सुरू असलेल्या राजकीय, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये भारताला अत्यंत मोठा धोका पाकिस्तानी अतिरेक्यांनी दिला आहे. पहलगाममध्ये 28 पर्यटकांना मारतांना त्यांनी त्यांचा धर्म विचारला. त्यातील काही महिलांना मारले नाही आणि त्यांना सांगितले जावून मोदीला सांगा. यानंतर सर्वात घाणेरडा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या व्हाटसऍप युनिर्व्हसीटीने केला आहे. त्यात त्यांनी एक व्यंगचित्र छापले आहे. जे मुळात घडलेला प्रकार आहे. त्यात एक पुरूष मरण पावला आहे आणि त्याची पत्नी त्याच्या प्रेता शेजारी बसलेली आहे. त्या चित्रावर भाजपने लिहिले आहे. धर्म विचारला जाती नाही. आम्ही सर्व लक्षात ठेवू किती घाणेरडा प्रकार आहे हा. या शब्दांमध्ये विरोधी पक्षांच्या जातीय जनगणनेवर टोला दिला आहे. काय हो पण असे आमची लेकरे मेली आहेत आणि तुम्हाला त्यावर राजकारण आठवते का? त्यात तर भर टाकली अर्णव गोस्वामी या पत्रकाराने त्यांच्या मते तर पहलगाम मधील प्रकार सर्वोच्च न्यायालयामुळे घडला आहे. बरे झाले याच कार्यक्रमात उपस्थितीत सेनेचे मेजर जनरल जी.डी.बक्षी यांनी त्या अर्णव गोस्वामीची वाट लावली. कधी काळी याच जी.डी. बक्षींचा उपयोग भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा अत्यंत जोरात करत होती. आमच्या देशाच्या पंतप्रधानांवर आमचा विश्र्वास आहे. परंतू भारतीय जनता पार्टीवर नाही. कारण त्यांनी या 28 मड्यांना चिताग्नी लावण्याअगोदरच त्यावर राजकारण सुरू केले आहे. तिकडे मुस्लिमांनी अडचणीत आलेल्या पर्यटकांसाठी अश्रु गाळत आहेत. तसेच आपल्या मस्जिदी पर्यटकांसाठी उघड्या केल्या आहेत. आज पर्यटकांचे वास्तव्य मस्जिदीमध्ये आहे.
काल 22 एप्रिल रोजी कश्मिरच्या पहलगाममध्ये 2 हजार पर्यटक एकाच ठिकाणी एकत्रित असतांना त्या ठिकाणी मात्र सुरक्षा यंत्रणा नव्हतीच, का नव्हती. दोन-चार दिवसांपुर्वीच कठूआमध्ये अतिरेक्यांनी दोन जणांना मारले होते. त्याचा बदला सैन्याने लवकरच घेत त्या अतिरेक्यांना कंठस्नान घातले. खरे तर या घटनेनंतर संपुर्ण कश्मिर भागात रेड अलर्ट जारी व्हायला पाहिजे होता. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वत: त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकणी त्यांनी सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेतला होता आणि त्यानंतर 72 तास पुर्ण होण्याअगोदर अतिरेक्यांनी 28 पर्यटकांचा जीव घेतला होता. ते काय म्हणाले. याला महत्व नाही. कारण त्यांच्या डोक्यात तर सर्वसफाईने भरलेले आहे. पण आम्ही त्याचा वापर करतांना आपल्या स्वार्थासाठी करावा हे दुर्देवी आहे. पुलवामा हल्ला झाला होता. तेंव्हा भारतातल्या पहिल्यांदा निवडणुकीत मतदान करणाऱ्या युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केले होते की, तुमच्या जीवनातील पहिले मत पुलवामा हल्यातील शहिदांच्या नावावर समर्पित करता येईल काय? अतिरेक्यांनी धर्म विचारला हे ठिक आहे. पण तुम्ही त्याचे धर्म विचारला जात नाही असे राजकारण करता काय? कारण असे लिहुन भारतीय जनता पार्टीने विरोधकांच्या जातीय जनगणनेला टोला मारलेला आहे. खरे तर एकजुटीने या अवघड परिस्थितीसमोर देशाने उभे राहायचे आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले होते की, आता 370 हटले आहे. आता कधीच अतिरेकी हल्ला होणार नाही. आम्ही आतंकवादाला गाढून टाकले आहे आता तो कधीच डोकेवर काढणार नाही. नोटबंदीनंतर सुध्दा हाच प्रचाराचा मुद्दा होता. आतकंवाद नोटबंदीमुळे संपेल. पण प्र्रत्यक्षात तसे काही घडले नाही. आमच्या मते भारतीय जनता पार्टी ज्या चित्राचा उपयोग करून धर्म विचारला जात नाही हे लिहून राजकारण करत आहे हे एक टुल किट आहे. कारण सरकार आपल्या जिम्मेदारीवरून हातवर करेल. त्यानंतर विरोधकांवर याचे नारळ फोडेल आणि कश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुलवर आरोप ठेवेल. खरे तर उमर अब्दुल्लाकडे एक चपराशी नेमण्याचा अधिकार सुध्दा नाही. पुलवामा हल्यात सुध्दा असेच झाले होते. सत्तेविरुध्द लोक बोलले होते. पण पुढे त्यांनाच देशद्रोही ठरवले गेले. गोदी मिडियातील पत्रकार अर्णव गोस्वामी तर आपल्या कार्यक्रमात पहलगामची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावर ठेवून टाकली. आता डोके फोडावे काय? पण याच कार्यक्रमात उपस्थिती असलेले मेजर जनरल जी.डी.बक्षी यांनी अर्णव गोस्वामीचा खरपुन समाचार घेतला. ते म्हणाले कोरोनाच्या तिन वर्षाच्या कालखंडात सैन्यात भरतीच झाली नाही. 1 लाख 80 हजार पदे सैन्याची कमी करण्यात आली आहे. एका सेक्टरची जबाबदारी असलेल्या सैन्याला तीन-तीन सैक्टरची जबाबदारी देण्यात आली. मनुष्यबळच नाही तर सैन्य काम कसे करेल.घाटीत मनुष्यबळाशिवाय योग्य सुरक्षा देणे अशक्य आहे. अशा पध्दतीने देशात आग लावण्याचा प्रयत्न या अतिरेक्यांनी केलेला आहे आणि सरकारचा राजकीय पक्ष त्याचे राजकारण करत आहे.
दुर्देव म्हणजे भारतात हिंदु-मुस्लिम हे भांडण लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमिरातच्या प्रिन्सला भेटण्यासाठी तेथे गेले आहेत. आता ते परत येणार आहेत. त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडला आहे. पण एकीकडे देशात मुस्लिमांविरुध्द आग ओकण्याचे काम आणि दुसरीकडे प्रिन्सच्या समोर डोके झुकविण्याचे काम काय प्रकार चालला आहे हा. हे वाचकांनीच ठरवावे. कश्मिरी जनता मात्र पर्यटकांच्या मृत्यूवर आपले आश्रु गाळत आहे. मेणबत्त्या जाळून निषेध व्यक्त करत आहेत. ज्या पर्यटकांनी सब कुछ ठिक है या शब्दांवर विश्र्वास करून कश्मिरला गेले त्यांच्यासोबत धोका झालेला आहे. म्हणून सरकार आणि सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न उपस्थितीत होतीलच. खऱ्या अर्थाने जम्मू काश्मिर केंद्र शाशित प्रदेशाचे व्यवस्थापन, तेथील पोलीस, तेथील सैन्या, केंद्रीय राखीव पोलीस बल गट आणि गुप्तहेर यंत्रणा हे सर्वच या घटनेसाठी जबाबदार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल, केंद्रीय मंत्री अमित शाह यांना सुध्दा प्रश्न विचारायला हवे. कारण अमित शाहने सांगितले होते की, आता आतंकवाद आमच्या नियंत्रणात आहे. आतकंवादाचे इको सिस्टीम आम्ही पुर्णपणे नष्ट केले आहे. तर त्यांना विचारणा करायला नको का ? आजपर्यंत पुलवामा हल्याचा निर्णय झालेला नाही आणि आम्ही अशी विचारणा केली तर आम्हीच देशद्रोही ठरविले जाऊ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यावर आतकंवादावर झिरो डॉलर्स ही पध्दती आम्ही अंमलात आणली असे अमित शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पहिले असे हल्ले होत. पण प्रश्न विचारले जात नव्हते, राजीनामे मागितले जात नव्हते. वर्तमान छोट्याशा कोपऱ्यात हल्याच्या बातम्या येत होत्या आणि आज तुमचे पत्रकार हल्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावर ठेवतात. लोकशाही किती आदर्श स्वरुपात भारतात चालू आहे हे यावरून दिसते.
पाकिस्तानचे सैना प्रमुख असद मुनीर म्हणाले, कश्मिरी आमचे भाऊ आहेत. त्यांच्या त्रासात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या हल्ल्याची बातमी करतांना अर्शफ वाणी हे पत्रकार हल्यातील गांभीर्य सांगत असतांना त्यांच्या आवाज कट करून बे्रकींग न्युज देण्यात आली. म्हणजे हल्याची रिपोटींग सुध्दा होवू दिली जात नाही. हे किती मोठे दुर्देव आहे ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला याचे चोख उत्तर द्यावे. आम्ही सरकारसोबत आहोत असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जारी केले आहे. आमच्याही मते आजचा हा हल्ला अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स भारतात असतांना झाला आहे. ते आपल्या कुटूंबासह भारतात आहेत. तेंव्हा परिस्थिती अत्यंत गांभीर्याने घेण्याची आहे. धर्म आणि जाती मागच्या विचारांवर वाचकांनी विचार करावा. आमच्या मते तर येणाऱ्या बिहार निवडणुकीच्या माध्यमासाठी हे असे कार्टून चित्र जारी करून भारतीय जनता पार्टीने घाणेरडे राजकारण केले आहे.
Leave a Reply