वफ्फ कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला गोचीत आणल्यानंतर खुद्द उपराष्ट्रपती जे कोणतेही राजकीय पक्षाचे नसतात आणि सोबतच भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते त्यांच्या विरुध्द बोलत आहेत. त्यांच्यावर दबाव आणत आहेत. पण देवजाणे सध्याचे सरन्यायाधीश शेर आहेत. येणारा तर सव्वाशेर आहे म्हणूनच आम्ही देव जाणे हा शब्द लिहिला आहे. आता यानंतर भारतीय जनता पार्टीने नवीन खेळी केली. बोहरा मुस्लीम आहेत. आता त्यांना आपल्या येथे बोलावून नरेंद्र मोदी यांनी चहा-पाणी केले आणि वफ्फ बोर्डाचा कायदा करतांना सर्वात पहिला संपर्क मी बोहरा मुस्लिमांशी साधला होता असे सांगितले. त्यानंतर त्यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांना पण भेटायला पाठवले. सोबतच येत्या 5 मे रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये बोहरा मुस्लिम समाजाच्यावतीने हरीश साळवे हे प्रसिध्द वकील वफ्फ कायदा कसा चांगला आहे हे मांडणार आहेत. आजही वफ्फ बोर्डावर शासनाचे नियंत्रणच आहे. फक्त नवीन कायदा सुधारणेत त्याचे दृष्टीकोण व्यापक करण्यात आले आहे. या संदर्भाने मुस्लिम समाजात अत्यंत प्रतिष्ठीत नाव असलेले जफरउल इस्लाम खान सांगतात भारतातले 20 कोटी मुस्लिम समाजापैकी 99.99 टक्के मुस्लिम समाज नवीन वफ्फ कायद्याच्या विरोधात आहेत. कोठे 20 कोठी मुस्लिम आणि कोठे 2 लाख बोहरा मुस्लिम काही तरी जोड आहे काय याची. पण तेवढ्यावरच दबाव आणण्याचा प्रकार गोदी मिडीया विविध रंगांनी सजवून समाजासमोर मांडत आहे. हे काय कमी दुर्देव आहे.
कोणत्या ना कोणत्या कारणानी नवीन नवीन खलबते तयार करून केंद्र शासन सर्वोच्च न्यायालयाविरुध्द तिकडम लढविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात सर्वात घाणेरडे शब्द मंत्री किरण रिजिजीव आणि खा.निशिकांत दुबे यांनी वापरले आहेत. ठिक आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता एक नवीन खेळी कालपासून सुरू झाली. ज्यामध्ये देशातील अत्यंत नामांकित वकील ऍड. हरीश साळवे आता बोहरा मुस्लिमांकडून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. मागील 11 वर्षाच्या कालखंडात जेव्हा जेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अडचणीत आले. तेंव्हा-तेंव्हा ऍड. हरीष साळवे यांनी अत्यंत देवदुतासारखे धावत नरेंद्र मोदींची अडचण समाप्त केली होती. म्हणून असेही म्हटले जात आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत ऍड. हरीष साळवे नक्कीच काही तरी नवीन मुद्या उपस्थित करून खेळ करतीलच.
आम्ही वाचकांसाठी बोहरा मुस्लिम समाजाचा ईतिहास देत आहोत. त्यांची संख्या जगात 3 लाख त्यातील 2 लाख भारतात. 140 कोटीच्या देशात 2 लाख बोहरा मुस्लिम. 20 कोटी मुस्लिम समाज ज्यामध्ये सिय्या, सुन्नी, देवबंधी, बरेली, दक्षीणेतील सादरी , पसमांदा मुुस्लिम आम्हाला एवढेच माहित आहेत. त्यात बोहरा 2 लाख पाहा आता काय मान्यता असेल त्यांची.. जवळपास 600 -700 वर्षापुर्वी इरानमध्ये मोठे प्रस्त असलेले बोहरा तेथील युध्दाच्या कारणामुळे भारतात आले. त्यांची वृत्ती ही व्यवसायीक आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मेहनतीत यश आले. भारतात 2 बोहरा मुस्लिम असले तरी ते सर्व श्रीमंत आहेत. आपल्या स्वत:ला त्यांची पुर्वीपासूनच वफ्फ कायद्यातून वेगळे ठेवलेले आहे. सन 1913 मध्ये पहिल्यादां वफ्फ कायदा आला. त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते. पण उत्कृष्ट व्यवसायीक म्हणून इंग्रजांकडे बोहरा मुस्लिम समाजाची प्रतिष्ठा होती आणि त्यात बोहरा समाजाला इंग्रजांनी वफ्फ कायद्यापासून वेगळे ठेवले. भारता जे बोहरा आले. त्यातील बहुतांश मंडळी गुजरातच्या कच्छ आणि सुरत परिसरात राहिली. बाकी इतर काही दुसरीकडे आहेत. पण त्यांची संख्या अत्यंत नग्न आहे. पण गुजरातच्या कच्छ आणि सुरतमध्ये राहिल्यामुळे त्यांचे संबंध भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगलेच राहिले आणि त्याचाच फायदा आज घेवून नरेंद्र मोदी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना सर्वच मुस्लिम वफ्फ कायद्याच्या विरोधात नाहीत हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कारण वफ्फ बोर्डाच्या कायद्यातील गुणवत्ता ही भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. गणपॉईंटवर जेपीसी, लोकसभा, राज्यसभा या मध्ये वफ्फ विधेयक मंजुर झाले हे खरे आहे. पण आता बोहरा मुस्लिमांच्या साथीने सरन्यायाधीशांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने हे पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय आहे काय? असा आरोप करून सर्व हिंदु नाराज आहेत असा दाखविण्याचा जो मुर्खपणाचा प्रकार आहे. तो तर आम्ही एका वाक्यात खोडून टाकू. भारतात 60 टक्के मतदान सरासरीने होत असते. त्यात 30 ते 31 टक्के मतदान भाजपला मिळते. त्यात मुस्लिमांचे मतदानपण असते. पण इतर हिंदु समाज वफ्फ कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही मुद्यांना स्थगिती दिल्यामुळे नाराज झाला असे म्हणणे निव्वळ मुर्खपणा आहे. कारण 60 टक्के मधील 31 टक्के यांचे तर उर्वरीत 29 टक्के मतदान हे फक्त मुस्लिम आहे काय? आणि असे नसेल तर सर्व हिंदु नाराज आहेत. या बाबीला मानने अत्यंत अवघड आहे. बोहरा मुस्लिम समाजाचे प्रार्थना स्थळ सुध्दा वेगळे आहेत. लोकशाहीत संख्याबळाला जास्त महत्व आहे आणि त्यात बोहरा मुस्लिम लोकशाहीच्या दृष्टीकोणातून नक्कीच मोठा आवाज नाही. म्हणून सर्वकाही आमच्या पध्दतीने घडविण्याचा भारतीय जनता पार्टीचा डाव यशस्वी होईल की नाही. तर सरन्यायाधीश संजीव खन्ना हे दबावात य ेतील की नाही हे 5 मे रोजी पाहुया.
Leave a Reply