Advertisement

मारतळा येथे 65 हजार रुपयांची चोरी – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-मौजे मारतळा ता.लोहा येथे एक ईलेक्ट्रीक साहित्याचे मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी 65 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे.
पंडीत उर्फ पुंडलिक अप्पाराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 एप्रिलच्या रात्री 1 ते पहाटे 4 वाजेदरम्यान मारतळा येथील त्यांचे ईलेक्ट्रीक आणि मोबाईल दुकान बंद असतांना त्याचे शटर वाकवून कोणी तरी चोरट्यांनी ते फोडले. चोरट्यांनी गल्यात असलेली रोख रक्कम 65 हजार रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 66 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. उस्माननगर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 69/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी हे करीत आहेत.


Post Views: 16






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?