नांदेड :-आज तहसील कार्यालय नांदेड येथे तालुकास्तरीय लोकशाही दिन संजय वारकड तहसीलदार नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी उपाधीक्षक भूमि अभिलेख यांच्या अनुषंगाने एक लोकशाही दिनामध्ये प्रकरण प्राप्त त्वरित प्रकरणावर कार्यवाही करण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांना प्रकरण वर्ग करण्यात आला. तालुकास्तरीय लोकशाही दिन तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी घेतला जातो.
आज पार पडलेल्या तालुका स्तरही लोकशाही दिनासाठी परमेश्वर कदम पोलीस निरीक्षक वजीराबाद पोलीस स्टेशन, नारवटकर सहाय्यक गटविकास अधिकारी नांदेड, मुंडे तालुका आरोग्य अधिकारी, सय्यद पोलीस उपनिरीक्षक लिमगाव, बोदगिरे उप निबंधक नांदेड, तालुका कृषी अधिकारी, दुय्यम निबंधक, नायब तहसीलदार महसूल, नायब तहसीलदार निवडणूक , तालुका पुरवठा अधिकारी, गटशिक्षणाधिकारी इत्यादी हजर होते. नांदेड तालुक्यामधील जनतेला आव्हान करण्यात येते की, ज्यांना तालुका लोकशाही दिनमध्ये तक्रार द्यावयाचे आहे. त्यांनी प्रत्येक महिन्याच्या सहा तारखेपर्यंत तक्रार द्यावी. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे,असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे.
Leave a Reply