Advertisement

10 फेबु्रवारीच्या नांदेड गोळीबार प्रकरणात हॅप्पी पॅशिया मुख्य सुत्रधार


नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी शहिदपुरा भागात झालेल्या गोळीबाराम एका युवकाचा मृत्यू आणि एक जखमी असा प्रकार घडला. त्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एकूण 8 जणांना अटक झाली. त्यात काही जण पंजाबचे आहेत तर काही जण नांदेडचे आहेत. या प्रकरणात मकोका कायदा जोडण्यात आला आहे. कॅनॅडामध्ये हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी पॅशीया हा युवक पकडल्यानंतर नांदेडमध्ये या घटनेसंदर्भाने एक नवीन शोध मोहिम तपास यंत्रणांनी सुरू केली आहे. या खटल्यात एनआयए, रॉ, आयबी यांच्यासह स्थानिक तपास यंत्रणा कार्यरत आहे. कारण हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधीत आहे. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार या प्रकरणात तपास यंत्रणांनी अनेक नवीन साक्षीदारांचा शोध घेतला आहे. त्यांची नावे गुप्त ठेवून त्यांना या प्रकरणात साक्षीदार करण्यात आले आहे. पुढे भविष्यात हॅप्पी पॅशिया सुध्दा या गुन्ह्याचा आरोपी होईल अशी खात्रीलायक माहिती आहे.
10 फेबु्रवारी रोजी नांदेड शहराच्या शहिदपुरा भागात घडलेल्या प्रकरणात हल्लेखोर हा पंजाब येथून आला होता हे सिध्द झाले. नांदेडच्या काही लोकांनी त्याला नांदेडमध्ये राहणे आणि हल्ला करण्यासाठी मदत करण्याची सोय केली होती. कोणी गाडी दिली होती, कोणी जेवणाची सोय केली होती अशा प्रकारे त्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. याप्रकरणी अगोदर वजिराबाद पोलीसांनी तिन जणांना पकडले. पुढे नंतर हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग झाला. या प्रकरणात ज्या व्यक्तीवर हल्ला झाला त्याने हरविंदरसिंघ उर्फ रिंदा या अतिरेक्याचा भाऊ सत्येंद्रसिंघ उर्फ सत्याचा खून केला होता आणि या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो पॅरोलवर आला होता. परंतू त्याचे सुदैव गोळीबारात तो वाचला आणि त्याचा नातलग मरण पावला.
दहशतवाद विरोधी पथकाने सुध्दा खुप मेेहनत घेतली आणि पंजाब येथील काही जणांना नव्याने अटक केली. तसेच नांदेड येथील काही जणांना पकडले. पुढे या प्रकरणात मकोका कायदा जोडला गेला आणि आता तर युएपीए जोडला जाणार आहे अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आणि तपास संस्था वेगवेळ्या पध्दतीने सबळ पुरावे जमा करत आहेत. या नवीन प्रगतीत कॅनॉडामध्ये अटक झालेल्या हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी पॅशीया या युवकाची अटक कारण आहे. रिंदा कोठे आहे याची माहिती अद्याप पुर्णपणे कोणाला माहित नाही. परंतू कॅनॉडामध्ये राहणारा लखविंदरसिंघ लंडा हा रिंदाच्यावतीने त्याच्या भारतातील कार्यवाह्यांचा प्रमुख होता. पुढे हे प्रमुख पद हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी पॅशीयाकडे गेले आणि आता हॅप्पी पॅशीयाला अटक झाल्यामुळे गोळीबार प्रकरणाला नवीन प्रगतीचा मार्ग सापडला आहे. त्यामुळे त्यात अनेक साक्षीदार जोडले जातील आणि त्या खटल्याला सुदृढता प्राप्त होईल. अशा खटल्यांमध्ये साक्षीदारांचे नाव ट्रॅकेट(गुप्त) ठेवण्याचा अधिकार पुरावा कायद्यात तपास यंत्रणांना आहे. त्याचाही फायदा होईल. पॅशीयाची हस्तांतरण प्रक्रिया सुरू असल्यामुळे काही वेळ लागेल जरूर परंतू एकदा पॅशीया भारतात आणला गेला तर तो नांदेडच्या गोळीबार प्रकरणातील आरोपी नक्कीच असेल अशी खात्रीलायक माहिती आहे.


Post Views: 10






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?