नांदेड(प्रतिनिधी)-ट्रान्सपोर्ट विभागात काम करणाऱ्या लोकांच्या अडचणी काय-काय असतात याचा एक प्रत्येय आज गुन्हा दाखल झाल्यानंतर आला. खंडणी प्रकरणात नाव असलेल्या काही जणांनी आपल्या इतर सात-आठ साथीदारांसह अबचलनगरमध्ये केलेल्या गोंधळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चरणजितसिंघ उर्फ सोनु जसविंदरसिंघ रतन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते अमरीकसिंघ जर्नेलसिंघ बल यांच्या एम.एस.भाटीया ट्रान्सपोर्टमध्ये मॅनेजर आहेत. माळटेकडीच्या रेल्वे रॅकवर येणाऱ्या खताचा पुरवठा ट्रकद्वारे इतरत्र करणे याचे कामकाज ते पाहतात. तीन महिन्यापुर्वी त्यांनी हरजितसिंघ सुच्चासिंघ चिमा यांना कंधार येथे खत घेवून जाण्याचे काम दिले. त्याच्यासाठी भाडे 7 हजार 250 रुपये ठरले. त्यातील अनामत रक्कम 5 हजार रुपये दिली. पण त्यावेळेस लिहिण्याचे काम पुर्ण झाले नाही. ट्रक क्रमांक एन.एल.01 एबी 9092 मध्ये खत कंधारला पोहचले त्यानंतर मी पुन्हा त्यांना 7 हजार 250 रुपये दिले. मी अगोदर दिलेल्या पाच हजार रुपये कापुन घेण्याचे विसरलो. नंतर लक्षात आल्यावर पैसे मागितले पण पैसे आजपर्यंत तर दिलेच नाही.
दि.17 एप्रिल रोजी हरजितसिंघ चिमाच्या त्याच ट्रक क्रमांक 9092 मध्ये क्षमतेपेक्षा जास्त साहित्य भरले असल्यामुळे ट्रक असोसिएशनच्या व्हाटसऍप गु्रप एमटीडीआय नांदेड यावर संघटनेने त्यात आपले साहित्य भरू नका असा संदेश पाठविला. हा संदेश पाहिल्यावर मी सुध्दा माझे 5 हजार रुपये घेणे आहे. कोणी या ट्रकमध्ये साहित्य भरले तर माझे 5 हजार रुपये कापुन घ्या असा संदेश पाठविला. तो संदेश पाहिल्यानंतर मला हरजितसिंघ चिमाने असा संदेश का टाकलास म्हणून शिवीगाळ केली. हरजितसिंघचा भाऊ रणजितसिंघ उर्फ सोनी चिमा हा नंादेड शहरातील कुख्यात गुंड असून त्याला अनेक गुन्ह्यामध्ये अटक झाली आहे. तो मकोकासारख्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये राहिला आहे. म्हणून मी भितीपोटी माझ्या सासरवाडीचे गाव बिदर येथे पळून गेलो.
त्यानंतर 17 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता माझा व्हाटसऍपवरील 5 हजार रुपयाच्या संदेशाचा राग मनात धरुन रात्री 11.30 ते 12 वाजेदरम्यान हरजितसिंघ सुच्चासिंघ चिमा, रणजितसिंघ उर्फ सोनी चिमा, राजबिरसिंघ रणदिपसिंघ चिमा, रबज्योतसिंघ उर्फ गब्या आणि गब्याचे सात ते आठ साथीदार माझ्या अबचलनगरच्या बंद घरासमोर आले. त्यांच्या हातात तलवारी होत्या. त्यांनी दारावर लाथा मारुन शिवीगाळ करत राहिले. त्यामुळे तेथे दहशत माजली आणि असे व्हायचे नसेल तर 25 हजार रुपये खंडणी दोन दिवसात आणून देण्याची मला धमकी दिली.
या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190, 308(3), 308(4), 351(4), शस्त्रअधिनियम 4/25 प्रमाणे गुन्हा क्रमांक 137/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास इतवारा येथील दुय्यम पोलीस निरिक्षक संजय शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.
भाड्याचे जास्तीचे पैसे परत करण्याच्या वादातून खंडणीची मागणी, जिवे मारण्याची धमकी

Leave a Reply