उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे राजीनामा सादर
नांदेड,(प्रतिनिधी)-आ. चिखलीकर यांच्या दबावाला, जाचाला, खोट्या तक्रारीला व जातीय द्वेषातून राजकारणातून निष्क्रिय करण्याच्या हेतूला कंटाळून नाईलाजास्तव आजरोजी प्रदेश कार्यकारिणी संघटक सचिव, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अॅड. संघरत्न गायकवाड यांनी निवेदनाद्वारे सादर केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी मागील पंधरा वर्षापासून म्हणजेच विद्यार्थीदशेपासूनच सच्चा कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर मी मागील 10 वर्षापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष असल्याने नांदेड जिल्ह्यात शालेय प्रश्नावर आवाज उठवत असतो. या अनुषंगाने मी ऑगस्ट-2024 मध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा व जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा उस्माननगर ता. कंधार येथील सन-2022 ते 2024 या काळात रु. 45 लाखाचा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. त्यात चौकशी समितीने अहवालसुद्धा तयार केलेला आहे. त्याचबरोबर जि.प.प्राथमिक शाळा घुंगराळा, ता. नायगाव येथे डिसेंबर-2024 मध्ये शालेय मैदानावर बॉम्बे डान्स (अश्लील-विभित्स नृत्य) आयोजित केले होते, या अनुषंगाने कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
दि. 10.10.2024 रोजी माझी नियुक्ती नांदेड शहराध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी झाली व नंतर सुद्धा मी विद्यार्थी चळवळीत कार्यरत होतो व डिसेंबर-2024 जि.प.प्राथमिक शाळा घुंगराळा, ता.नायगाव येथे शालेय मैदानावर बॉम्बे डान्स (अश्लील-बिभित्स नृत्य) आयोजित केला होता, या अनुषंगाने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. सदर तक्रार मागे घ्यावी, म्हणून लोहा-कंधार विधानसभा विद्यमान आ. प्रताप पाटील चिखलीकर हे माझ्यावर दबाव आणत होते. त्यांचा विरोध पत्करून मी विद्यार्थी चळवळ पुढे नेण्याकरिता पाठपुरावा करीत होतो, याचा आकस मनात ठेऊन आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रा. सुनील मगरे प्रदेशाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग, राष्टवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडे खोट्या तक्रारी करून मला नांदेड शहराध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग या पदावरून काढून टाकले व निष्क्रिय करण्याच्या हेतूने मला मार्च-2025 मध्ये प्रदेश कार्यकारिणी संघटक सचिवपदी निवड केली. तरीसुद्धा मी विद्यार्थी चळवळ, सामाजिक चळवळ व पक्ष वाढीसाठी कार्यरत असताना ऑगस्ट-2024 मध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा व जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा उस्माननगर, ता. कंधार येथील सन-2022 ते 2024 या काळात रु. 45 लाखाचा गैरव्यवहार उघकीस आण्यासाठी प्रयत्न करीत होतो व त्यानुषंगाने तसा चौकशी अहवाल सुद्धा आला आहे. सदर तक्रार मागे घ्यावी म्हणून आ. प्रताप पाटील चिखलीकर हे माझ्यावर दबाव आणत आहेत व झालेला भ्रष्टाचार उघकीस आणण्यासाठी आडकाठी आणत आहेत व त्याचबरोबर जातीय द्वेषातून मला राजकारणातून निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव आजरोजी प्रदेश कार्यकारिणी संघटक सचिव, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पदाचा राजीनामा सादर करीत आहे. मी पदाचा राजीनामा देत असलो तरीसुद्धा मी सदैव राष्टवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे व एक सच्चा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी पक्ष समाजातील प्रत्येक घटकात पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असेही निवेदनात अॅड. संघरत्न गायकवाड यांनी म्हटले आहे.
Leave a Reply