Advertisement

अल्पवयीन बालिकेला लैंगिक त्रास देणाऱ्या कुुलकर्णीला चार वर्ष शिक्षा


नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला शिकवणी वर्गासाठी घेवून जाणाऱ्या ऍटो चालकाने एका दिवशी त्या बालिकेसोबत दुरव्यवहार केला. या प्रकरणात नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वैद्यपाठक यांनी ऍटो चालकाला 4 वर्षाची साधी कैद आणि 10 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.23 जुलै 2022 रोजी पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत राहणाऱ्या 12 वर्ष 10 महिने वय असलेल्या बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलीला एम.एच.26 बी.डी.5122 ऍटो चालक सुनिल शंकरराव कुलकर्णी (48) हा दररोज शिकवणीसाठी सायंकाळी 4 ते 7 यावेळेत घेवून जात होता. पण दि.22 जुलै 2022 रोजी दररोज प्रमाणे मुलगी घरी आली नाही याची चिंता झाल्याने आई रस्त्यावरच उभी राहिलेली होती.रात्री 7.15 वाजता येणारी मुलगी 8.15 वाजता आली. ऍटो चालक सुनिल कुलकर्णी तिला सोडून अत्यंत जोरात आपला ऍटो पळवून निघून गेला. बालिकेने सर्व घटनाक्रम आपल्या आईला सांगितला. आईने आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर या प्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 354, 354(अ), 506 आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 8 आणि 12 प्रमाणे गुन्हा क्रमांक 248/2022 दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार ओमप्रकाश कवडे यांनी केला.
तपासादरम्यान बालिकेवर अत्याचार करणारा ऍटो चालक सुनिल शंकरराव कुलकर्णी यास अटक झाली आणि तपासाअंती त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हा खटला विशेष पोक्सो खटला क्रमंाक 91/2022 प्रमाणे न्यायालयात सुरू झाला. सुनावणी दरम्यान एकूण 6 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालसमक्ष नोंदवले. या खटल्याचा युक्तीवाद करतांना सहाय्यक सरकारी वकील ऍड. एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी घडलेला प्रकार हा पुर्णपणे सिध्द झाला असल्याने गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या प्रकरणात भाग्यनगरचे पोलीस अंमलदार सादिक पटेल यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वैद्यपाठक यांनी कलम 8 आणि 12 प्रमाणे 4 वर्ष साधी कैद आणि 5 हजार रुपये रोख दंड. दंड भरला नाही तर एक वर्ष साधी कैद तसेच कलम 8 प्रमाणे तीन वर्ष साधी कैद आणि 5 हजार रुपये रोख दंड. दंड न भरल्यास आठ महिने कैदेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी सुनिल कुलकर्णीला दोन्ही शिक्षा सोबतच भोगायच्या आहेत. शिक्षेत जमा झालेली रोख रक्कम या प्रकरणातील पिडीत बालिकेला देण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिले आहेत.


Post Views: 5






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?