मुंबई- भारताच्या 52 व्या सरन्यायाधीश पदावर अनुसूचित जातीचे अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारश्रेणीतील पुत्र भुषण गवई यांचा क्रमांक लागला आहे. ते भारताच्या सरन्यायाधीश पदावर बसणारे दुसरे अनुसुचित जातीतले व्यक्ती आहेत.
अमरावती जिल्ह्यातील प्रसिध्द व्यक्तीमत्व रा.सु.गवई उर्फ दादासाहेब यांचे चिरंजीव आहेत. भुषण गवई त्यांचे एक बंधू आहेत. राजेंद्र आणि बहिण किर्ती. रा.सु. गवई हे 12 व्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्रात विधान परिषदेचे उपसभापती पद, सभापती पद भुषवले आहे. त्यांनी बिहार, सिक्कीम, केरळ या राज्यात राज्यपाल पदावर काम केल आहे. आपल्या शिक्षण पुर्ण केल्यानंतर भुषण गवई यांनी 1985 पासून वकीली व्यवसायाची सुरुवात केली. 24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयातील न्यायमुर्ती या पदावर पाठविण्यात आले. सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमुर्ती भुषण गवई यांचे नाव सरन्यायाधीश पदी सुचवले आहे. येत्या 11 मे रोजी संजीव खन्ना सेवानिवृत्त होणार आहेत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाारांचे पुत्र भुषण गवई हे सरन्यायाधीश पदावर विराजमान होणार आहेत. या अगोदर 2007 मध्ये के.जी. लालकृष्णन हे एक आंबेडकरी विचारांचे पुत्र सरन्यायाधीश पदावर कार्यरत होते.
भारतीय संविधानाचे नाव घेतल्याशिवाय भारतात कोणाचेही राज्य चालत नाही. हे खरे असतांना सुध्दा वेगवेगळ्या पध्दतीने संविधानाला बदलण्याचा प्रकार सातत्याने घडत आलेला आहे. भारतीय संविधानाने आपल्यामध्ये बदल करण्याची गरज दिलेली सुध्दा आहे. कारण संविधान शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना माहित होते की, पुढच्या भविष्य काळात संविधानातील काही शब्दांचा अर्थ बदलेल आणि त्या ठिकाणी नवीन शब्दांची गरज असेल. परंतू त्याचा दुरूपयोग करत अनेकदा सत्ताधाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी काय करता येईल यासाठी प्र्रयत्न केलेले आहेत. पण भुषण गवई आल्यानंतर ते सुध्दा भारतालाच नव्हे तर जगाला दाखवून देतील की, भारताचे संविधान हे भारतातच नव्हे तर जगात सर्वोपरी आहे अशी अपेक्षा करत भुषण गवई यांच्या नुतन जबाबदारीसाठी शुभकामना..
भारताचे 52 वे सरन्यायाधीश डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारपुत्र भुषण गवई

Leave a Reply