नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन आणि छत्रपती संभाजी नगर येथील एमआयडीसी पोलीस ठाणे वाळूज येथील एक अशी तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या तीन चोरट्यांकडून एकूण 1 लाख 16 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड शहरातील प्रवीण बाबुराव शिंदे आणि अविनाश रघुबुआ भारती यांच्यासोबत दिनांक 8 एप्रिल आणि 15 एप्रिल रोजी सिडको भागात चोरीचा प्रकार घडला. त्यामध्ये दोन मोबाईल चोरीला गेले होते. आणि एक दुचाकी चोरीला गेली होती. पोलीस उप अधिक्षक सुशील कुमार नायक,पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड आणि पोलीस अंमलदार वसंत केंद्रे, सुनील गटलेवाड, प्रमोद कराळे, माने, आवळे, पवार, कल्याणकर या सर्वांनी मेहनत घेऊन सावळेश्वर तालुका कंधार येथील यश राजू कांबळे आणि तेजस राजू कांबळे या दोघांना ताब्यात घेतले. तसेच या दोघांच्या माहितीनंतर सोमेश नवनाथ शेरकर राहणार पूर्णा या तिसऱ्याला पकडले या तिघांनी मिळून या दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. सोबतच छत्रपती संभाजी नगर येथील एमआयडीसी वाळूज परिसरात सुद्धा चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी या तीन चोरट्यांकडून तीन मोबाईल आणि एक दुचाकी असा 1 लाख 16 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणाचा तपास कोणी जमादार तेलंगे आणि मांजरमकर करीत आहे
Leave a Reply