नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात महिलेला एकटी पाहुन काकु दुध घेता का अशी विचारणा करून काही चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने चोरून नेली आहे.
दिलीप रमाकांत कोटगिरे रा.राममंदिर गल्ली मुखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजेदरम्यान त्यांच्या घरात त्यांच्या आई सुलोचना या एकट्याच होत्या. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या आईला काकु दुध घेता का अशी विचारणा केली आणि या चर्चेदरम्यान त्या चोरट्याने सुलोचना यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची चैन बळजबरीने चोरून नेली आहे. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 79/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गोंटे हे करीत आहेत.
Leave a Reply