नांदेड(प्रतिनिधी)-प्रमाणिकपणा कमी होत चालला असला तरी नांदेडच्या एका ऍटो रिक्षा चालकाने आपल्या कर्तव्यातील प्रामाणिक पणा शिल्लक ठेवला आहे. त्यात एक आणखी एका अनुभवाची दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी गुरूवारी दुपारी भर पडली. ऑटोरिक्षा चालक प्रकाश धुताडे रा बांरसगाव यांच्या रिक्षामध्ये डॉ बुशरा कची व त्यांचे सहकारी मैत्रिणी विष्णुपुरी ते कोर्ट, शिवाजी महाराज पुतळा प्रवासादरम्यान एक बॅग रिक्षामध्ये विसरली.
लगेच नोटरी येथील कर्मचारी शेख बबलू यांनी महिला डॉकटरांना टायगर ऑटोरिक्षा चालक संघटनाचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) बागवाले याचं मोबाईल नंबर दिला. त्या विद्यार्थ्यांनींनी सांगितले आमची काही मदत करू शकता काय? त्यानंतर ऍटो रिक्षा चालकांची शोध मोहिम सुरू झाली आणि ऍटो चालक प्रकाश धुताडेंचा क्रमांक भेटल्यावर डॉक्टर विद्यार्थींची विसरलेली बॅग व कागदपत्रे विष्णूपुरी येथे जाऊन परत करतांना टायगर संघटनाचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा), रिक्षा चालक प्रकाश धुताडे यांची उपस्थिती होती. डॉक्टरांनी प्रकाश धुताडे यांना 500 रुपये बक्षीस देऊन शुभेच्छा दिल्या.
ऑटो चालकाचा प्रामाणिक पणा, रिक्षा मध्ये विसरलेले डॉक्टर विद्यार्थिनीचे एमबीबीएसचे ओरिजनल कागदपत्रे केले परत

Leave a Reply