नांदेड(प्रतिनिधी)-बाफना रोडवर आयपीएल क्रिकेट सामन्यांवर जुगार चालविणाऱ्या एका व्यक्तीविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरिक्षक नागनाथ आहिल्याबाई हनमंतगोंडा तुकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता हरजितसिंघ पुरणसिंघ चुघ यांच्या घरात आयपीएल क्रिकेट मधील दिल्ली विरुध्द राजस्थान रॉयल्स या 20 षटकीय सामन्यात क्रिकेट माझा या ऍपवर पाहत क्रिकेट सट्टा लावून जुगार खेळ आणि खेळवित असतांना 11 हजार 250 रुपयांच्या साहित्यासह मिळून आला. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा क्रमांक 167/2025 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माडगे हे करीत आहेत.
आयपीएल जुगारावर छापा

Leave a Reply