नांदेड(प्रतिनिधी)-सोनखडे पोलीसांनी एक हायवा गाडी पकडून त्यातील बेकायदा वाळु असा एकूण 40 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार दिगंबर श्रीराम कवाळे यांनी 15 एप्रिल रोजी रात्री 8 ते 9 वाजेदरम्यान डेरला कॅनॉल जवळ एम.एच.26 बी.ई. 4300 या हायवा गाडीची तपासणी केली. त्यामध्ये 25 हजार रुपये किंमती 5 ब्रास वाळू भरलेली होती. ज्या संदर्भाने कोणतेही कागदपत्र त्यांनी दाखवले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी ओमकार भिमराव माटोरे वाहन चालक रा.पालम जि.परभणी आणि हायवा मालक सुनिल दत्तात्रय विश्र्वास रा.बामणी ता.लोहा यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 89/2025 द ाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात सोनखेडेेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस अंमलदार गणपत गिते, विश्र्वनाथ हंबर्डे, ज्ञानोबा कौठेकर, दिगंबर कवाळे, विजय मरळकर आणि देवकत्ते यांनी ही कार्यवाही केली.
Leave a Reply