नांदेड :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सोहळा – 2025 औचित्याने पोलीस प्रशासनाने नांदेड शहरातील मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. तसेच मिरवणुकीत स्वखर्चातून दोन ऍम्ब्युलन्स मेडिकल सुविधेसह उपलब्ध करून दिल्याबद्दल नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांचा रिपब्लिकन सेना नांदेडच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे, महानगर अध्यक्ष राहुल चिखलीकर, जिल्हा प्रवक्ता प्रतिक मोरे, शाहीर आनंद कीर्तने, आंबेडकरवादी नेते प्रितम जोंधळे आदींची उपस्थिती होती.
नांदेड शहर व ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक सुशीलकुमार नायक हे नेहमीच आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न सुरू असतो. कायदा मोडणाऱ्यांची कधीही गय ना करणाऱ्या डीवायएसपी नायक यांच्यातील एक संवेदनशील माणूसही नांदेडकरांनी अनेक वेळा अनुभवला आहे. महिला व मुलींच्या प्रश्नांच्या बाबतीत तर ती नेहमीच अत्यंत तळमळीने पुढाकार घेऊन काम करत असतात . याशिवाय राष्ट्रपुरुषांच्या जयंती निमित्त च्या रॅलीतही कोणतीही बाधा येऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात .
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा पार पडला . या सोहळ्याच्या कालावधीत कोणत्याही नागरिकाला कसल्याही प्रकारची आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी प्राथमिक उपाययोजना म्हणून त्यांनी स्वतःच्या खर्चातून दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या . एवढेच नाही तर भीम जयंतीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते रस्त्यावर उभे राहून बंदोबस्तात सक्रिय होते. परिणामी नांदेड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निर्विघ्न आणि कुठलेही गालबोट न लागता पार पडली. या एकूण कामगिरीबद्दल नांदेड पोलिसांचा गौरव व्हावा यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून पोलीस उपधीक्षक सुशीलकुमार नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
Leave a Reply