नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील जोशी हॉस्पीटलच्या पाठीमागे 14 एप्रिल रोजी रात्री 8.30 ते 9 वाजेदरम्यान एका 22 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे आणि दोन युवक जखमी आहेत.
सचिन जनार्धन हाटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचा भाचा राहुल दिपके, त्यांचा चुलत भाऊ हर्ष दिपके हे सर्व हास्सापुरकडे जात असतांना चार अनोळखी युवक आले ज्यांनी तोंडाला मास्क बांधलेला होता. त्यात त्या युवकांनी खंजीरने केलेल्या हल्यात राहुल विनोद दिपके(22) याचा मृत्यू झाला आहे आणि हर्ष दिपके हे गंभीर जखमी झाला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 161/2025 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक तुरनर अधिक तपास करीत आहेत.
शिवाजीनगर भागातील जोशी हॉस्पीटलच्या पाठीमागे एका युवकाचा खून तर एक जखमी

Leave a Reply