छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथी समारोहासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भोजनात शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते सहभागी झाले नाहीत. रायगडावर भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी दिली नाही. या दोन घटना नक्कीच असे सांगतात की, महाराष्ट्राच्या एनडीए सरकारमध्ये अर्थात डबल इंजिन सरकारमध्ये सर्व काही ठीक चाललेले नाही. मागील 50 तासांपासून याची चर्चा जोरात सुरू आहे.
कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची एक सरकार होती. या सरकारमध्ये सुरूंग पेरले गेले. त्यातून शिवसेना दोन गट झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले. त्यानंतर त्यात भाजप जोडली गेली कारण हा सर्व जोडणीचा खेळ भाजपनेच केला होता. परंतु नवीन सरकार बनविताना एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात खटके सुरू राहिले. पुर्वीच्या सरकारमध्ये सुरूंग लावताना सुद्धा या खटक्यामुळेच लावला होता, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी अनेकदा केले आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही विजयाच्या रथावर स्वार होते, परंतु त्यावेळेसच्या राजकीय परिस्थितीनुसार मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र भाजप 132 आमदारांचा आकडा घेऊन विजयी झाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि इतर दोन उपमुख्यमंत्री झाले.
दरम्यान याच महिन्यात महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी एक पत्र जारी केले, या पत्रानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडच्या संचिका ज्या अंतिम मंजूरीसाठी मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात, त्या अगोदर संचिका एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील. त्यामुळे पुन्हा नवीच गोची तयार झाली. आता पवार आपल्या संचिका पुढे पाठवतील तरच तपासणी होतील, म्हणजे पुन्हा हा वादाचाच विषय आहे.
छत्रपती शिवाजी राजांच्या 345 व्या पुण्यतिथीसाठी गृहमंत्री अमित शाह रायगडावर आले होते, कार्यक्रम झाल्यावर सुनील तटकरे यांच्या घरी जेवणाचा समारंभ होता. या जेवणाच्या समारंभात स्थानिक शिवसेना नेते आले नाहीत. याबद्दल बोलताना सुनील तटकरे सांगतात आम्ही त्यांना तर बोलाविले होते, पण ते का आले नाही, हे आम्हाला माहित नाही. यामागचा गेम असा दिसतो की, रक्षा खडसे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते, पण विदेशात असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली होती, आजही रायगडमध्ये पालकमंत्री नाही. महाराष्ट्रात सुरू झालेले हे वादळ दिल्लीपर्यंत पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांना अभिवादन करण्यासाठीचे कारण घेऊन अमित शाह तेथे आले होते, पण त्या कार्यक्रमात सुद्धा अजित पवारांना बोलू दिले नाही. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तिखट प्रतिक्रिया जगाला माहित आहेत. सायंकाळी पुन्हा एक बैठक रात्री उशीरापर्यंत चालली. त्या बैठकीत सुद्धा अजित पवारांना बोलाविण्यात आले नव्हते. याचा काय अर्थ घ्यावा आणि काय समजावा यासंदर्भाची जबाबदारी आम्ही वाचकांवर सोडत आहोत.
Leave a Reply