नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी नोंदणी नंबर नसलेली हायवा गाडी पकडली. ज्यामध्ये अवैधरित्या वाळू भरलेली होती. एकूण 5 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल या घटनेत जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार रामकिशन पांडुरंग मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 एप्रिल रोजी रात्री ते चेकिंग करत असताना लोहा रस्त्यावरील वाडीपाटी येथे एक नोंदणी क्रमांक नसलेली हायवा गाडी पाहिली. या गाडीची चौकशी केली असता त्यामध्ये चार ब्रास वाळू भरलेली होती. या वाळू बद्दलचे कोणतेही कागदपत्र त्यांच्याकडे नव्हते. त्यानंतर या प्रकरणात माधव शिवाजी बकाल (24) रा. राहटी ता. पूर्णा जि. परभणी आणि दत्तराम गोविंदराव शिंदे (43) रा.डेरला ता. लोहा जि. नांदेड या दोघांविरुद्ध गुन्हा क्रमांक 364/2025 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उप अधिक्षक सुशील कुमार नायक आणि पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण पोलीस, अंमलदार मोरे, भिसे, कलंदर, माळगे आणि सिरमलवार यांनी ही हायवा गाडी पकडली आहे. या प्रकरणात हायवा गाडी आणि 4 ब्रास वाळू असा एकूण 50 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Leave a Reply