-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व सामाजिक समता सप्ताहाचा समारोप करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे मा. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. पी. विठ्ठल, नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, डॉ. पांडुरंग पांचाळ, गिरीष जोंधळे, शिवराम लुटे, उद्धव हंबर्डे, जालिंदर गायकवाड, नारायण गोरे, बंडू कांबळे, संदिप लुटे, केशव कल्याणकर, संदीप एडके, रामदास खोकले, प्रदिप बिडला, संभा कांबळे, शिवाजी हंबर्डे, बालाजी शिंदे, मारोती कदम, बबन हिंगे, संतोष जोगदंड यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
Leave a Reply