नांदेड- आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती 14 एप्रिल2025 रोजी आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासन, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र यांच्या समन्वयाने जय भीम पदयात्रेचे आयोजन रविवार 13 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 7.30 वा. करण्यात आले आहे.
या पदयात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे आहे. श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम, जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृह येथून सुरुवात होऊन आयटीएम कॉलेज-ग्लोबल हॉस्पीटल समोरुन-महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन- परत कुसुम सभागृह मार्ग- जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा वसतिगृह येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.
या पदयात्रेमध्ये नांदेड जिल्हयातील शैक्षणीक संस्थेमधील शालेय विद्यार्थी, विविध क्रीडा संघटनेचे खेळाडू, एन.सी.सी., एन.वाय.के.एस., भारत स्काऊट ॲन्ड गाईड, जिल्हा प्रशासन अंतर्गत विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी इत्यादींच्या सहभागाने जयभीम पदयात्रा संपन्न होणार आहे.
त्याकरीता नांदेड जिल्हयातील सर्व मान्यवर, लोकप्रिय प्रतिनिधी, सर्व विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी, सर्व शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी, खेळाडू, विविध क्रीडा संघटनेचे खेळाडु मुले-मुली, प्रशिक्षक व पदाधिकारी, विद्यापीठे, एनजीओ, एनएसएस, एन.वाय.के संस्था, भारत स्काऊट ॲन्ड गाईड व My Bharat Volunteers, एनसीसी व आदींनी या पदयात्रेत जास्तीतजास्त मोठया संख्येने उपस्थित राहुन सहभाग नोंदवावा व शासकीय उपक्रमांस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग (प्राथ./माध्य), जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
Leave a Reply